मुख्यपृष्ठ / पाककृती / Narali bhat

Photo of Narali bhat by Pranali Deshmukh at BetterButter
1
3
2(1)
0

Narali bhat

Jan-21-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Narali bhat कृती बद्दल

नारळी भात आपण नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाला करतो .

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. 1 कप तांदूळ बासमती
 2. 1/2 कप किसलेला गूळ
 3. दिड कप पाणी
 4. 1/4 कप खोवलेलं नारळ
 5. 2 गबसप साजूक तूप
 6. 1 तमालपत्र
 7. 2 लवंग
 8. 1 छोटा चमचा वेलची पावडर
 9. 6-7 काजू बेदाणे

सूचना

 1. तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
 2. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
 3. तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
 4. गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा.
 5. नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
 6. जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
 7. झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे
 8. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
 9. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Jan-24-2018
BetterButter Editorial   Jan-24-2018

Hi Pranali, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर