मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा बेसन लाडू

Photo of Rava besan ladu by pranali deshmukh at BetterButter
865
10
0.0(0)
0

रवा बेसन लाडू

Jan-21-2018
pranali deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा बेसन लाडू कृती बद्दल

दिवाळीचा फराळ म्हटलं तर लाडूंशिवाय पूर्ण वाटत नाही .रवा बेसन लाडू चवीला छान होतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी रवा
  2. 1/2 वाटी बेसन
  3. 1 वाटी साखर
  4. 1/2 वाटी पाणी
  5. 1/4 वाटी साजूक तूप
  6. १ छोटा चमचा वेलची पावडर
  7. 10-12 काजू बदामाचे काप

सूचना

  1. बारीक रवा मध्यम आचेवर कोरडाच भाजावा. गुलाबीसर रंग येऊ द्यावा.
  2. तसेच भाजताना सतत सराट्याने उलथत राहावा. मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.
  3. रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा. त्याच कढईत तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे. बदाम काजूचे काप घालावे.
  4. दुसर्‍या पातेल्यात १ कप साखर आणि १/२ कप पाणी घालून एकतारी पाक करावा. एकतारी पाक करण्यासाठी साखर पाणी एकत्र करावा एक उकळी येऊ द्यावी
  5. उकळी आली कि मिश्रण फेसाळेल आणि फेस कमी झाला कि अर्ध्या मिनीटात लगेच गॅस बंद करावा आणि हा पाक रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घालावा.
  6. चमच्याने ढवळावे आणि झाकून ठेवावे. वेलचीपूड घालावी. हळू हळू मिश्रण आळेल आणि लाडू वळण्याइतपत घट्ट झाले कि लगेच लाडू वळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर