मुख्यपृष्ठ / पाककृती / एगलेस खजूर आणि अक्रोडाचा केक

Photo of Eggless date and walnut cake by Divya Jain at BetterButter
837
8
0.0(0)
0

एगलेस खजूर आणि अक्रोडाचा केक

Jan-21-2018
Divya Jain
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एगलेस खजूर आणि अक्रोडाचा केक कृती बद्दल

या केक आहे, चवदार आणि निरोगी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३/४ कप मैदा
  2. १/२ कप खजूराचे तुकडे
  3. १/४ कप पाणी, खजूर भिजवण्यासाठी
  4. १/४ कप अक्रोडाचे तुकडे
  5. ७ oz कन्डेन्स मिल्क (३/४ कप + २ टेस्पून)
  6. ४ टेस्पून बटर (अनसॉल्टेड), वितळवून
  7. १ टिस्पून बेकिंग सोडा
  8. १/२ टिस्पून बेकिंग पावडर
  9. १/२ टिस्पून वेनिला इसेंस

सूचना

  1.  १/४ कप कोमट पाण्यात खजूराचे तुकडे साधारण ३० मिनीटे भिजवून ठेवावे. नंतर खजूर पाण्यातून काढावे, बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पेस्ट करताना भिजवायला वापरलेले पाणी वापरावे.
  2. ओव्हन ३२५ F (१६० C) वर प्रिहीट करावे. मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून २ ते ३ वेळा चाळून घ्यावे, यामुळे तिन्ही जिन्नस छान मिक्स होतील आणि गुठळ्या राहणार नाहीत. दुसर्‍या वाडग्यात कन्डेन्स मिल्क, वितळवलेले बटर आणि वेनिला इसेंस घालून मिक्स करावे. मैद्याचे मिश्रण घालून गुठळ्या न होता फेटून घ्यावे. नंतर त्यात खजूराची पेस्ट आणि अक्रोडाचे तुकडे घालून मिक्स करावे.
  3. ओव्हनसेफ भांडे आतून बटरने ग्रिस करावे म्हणजे केक बेक झाला कि भांड्याला चिकटणार नाही. केकसाठीचे मिश्रण भांड्यात ओतावे आणि वरून चमच्याने सारखे करावे. प्रिहिट केलेल्या ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर केकचे भांडे ठेवावे आणि ४५ मिनीटे बेक करावे.
  4.  ४५ मिनीटांनी ओव्हन बंद करावे, पण भांडे लगेच बाहेर काढू नये. ५ मिनीटांनी बाहेर काढावे.
  5. ५ मिनीटांनी भांडे ओव्हनच्या बाहेर काढावे आणि जाळीच्या रॅकवर काढून ठेवावे आणि गार होवू द्यावे. केक गार झाला कि सावकाशपणे भांड्यातून बाहेर काढावा. कापण्यापूर्वी केक पूर्ण गार झाला पाहिजे. १/२ इंचाचे तुकडे करून डब्यात भरून ठेवावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर