Photo of Mutton curry by Mrudula Ghose at BetterButter
3520
6
0.0(0)
0

मटन करी

Jan-29-2018
Mrudula Ghose
59 मिनिटे
तयारीची वेळ
46 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटन करी कृती बद्दल

ही नागपूर स्पेशल झणझणीत करी आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2किलो मटण
  2. 2कांदे
  3. २टोमँटो
  4. 3टेबल स्पून धने
  5. थोड मसाला फूल
  6. १टेबल स्पून जिरे
  7. १/२टीस्पून शाही जिरे
  8. ५/६काळी मिरी
  9. १टेबल स्पून तीळ
  10. १टेबल स्पुन खसखस
  11. ३/४छोटी ईलायची
  12. ४/५लवंगा
  13. १मोठा टुकडा कलमी
  14. सुक खोबर५०ग्राम
  15. १वाटी कोथिंबीर
  16. अदरक मोठा टूकडा
  17. १२/१५लसणाच्या पाकळ्या
  18. १तेजपान
  19. हळद, मीठ चवीनुसार
  20. ५टेबल स्पून लाल तिखट
  21. ५मोठे चम्मच तेल

सूचना

  1. मटन स्वच्छ धुवून १५/२०मिनिटे उकळून घ्या.
  2. कांदे भाजून घ्या.
  3. एका पँन मधे सगळे गरम मसाला सूकच भाजा.
  4. खोबरे ही भाजुन घ्या
  5. भाजलेला गरम मसाला, खोबरं, कांदा, अदरक, लसूण आणि कोथिंबीर सगळ चांगले बारीक वाटून घ्या
  6. पातेल्यात तेल गरम झाले की तेजपत्ता टाकून , वाटलेला मसाला चांगले तेल सुटे पर्यत परतून घ्या.
  7. नंतर तिखट, हळद टाकून वाफवून घेतलेले मटण टाकून , चांगले ५/१०मिनिटे परता
  8. नंतर मिठ आणि टोमँटो ची पयुरी टाकून परत मध्यम आंचेवर झाकून १०/१५ मिनिटे तेल वर येई चतोर शिजवा
  9. मग गरजेनुसार पाणी टाकून , मध्यम आचेवर मटण शिजेपर्यंत शिजवा.
  10. वरून कोथिंबीर पेरून पूरी, परांठा, भाकरी किंवा नागपूरी खास लांब पोळ्या बरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर