Photo of BHARLI vangi by Chayya Bari at BetterButter
1328
9
0.0(1)
1

BHARLI vangi

Jan-29-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काट्याची वांगी पावशेर
  2. खोबरे किस ४चमचे
  3. कांदा १मोठा
  4. शेंगदाण्याचा जाडसर कूट २चमचे
  5. कोथींबीर १वाटी
  6. लसूण ७पाकळ्या मोठ्या
  7. आले पेराइतके
  8. जिरे,मोहरी,हिंग फोडणीला
  9. हळद १/२चमचा
  10. तिखट १चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. काळा मसाला २चमचे
  13. गूळ किंचित ऐच्छिक
  14. तेल ३,४चमचे आवडीनुसार

सूचना

  1. तयारीत शेंगदाणे भाजून जाडसर कूट केला
  2. खोबरे किस व कांदा कापून भाजून घेतला
  3. मिक्सरवर आले,लसूण,कोथिंबीर खोबरे व कांदा बारीक केले वाटण तयार
  4. मग वांगी धुऊन त्याला दोन चिरे दिले
  5. वाटणात मीठ तिखट गूळ हळद काला मसाला कूट मिक्स केले
  6. ह्ये वाटण वांग्यात भरले थोडे वाटण उरले पाहिजे
  7. तेल तापवून जिरे मोहरी हिंग घालून फोडणी केली
  8. त्यात उरलेले वाटण टाकून परतले किंचित पाणी घातले
  9. तेल सुटल्यावर वांगी टाकून परतले
  10. कप भर गरम पाणी घातले
  11. हलवून झाकण ठेवले ५मिनिटाने हलवून गॅस माध्यम केला व झाकणावर पाणी ठेवले
  12. ३मिनिटाने झाकणावरील पाणी आत सोडले हलविले व गॅस मंद केला
  13. वांगी शिजेपर्यंत भाजी मंद गॅसवर ठेवली
  14. अधूनमधून हलविले
  15. भाजी तैयार
  16. गरम गरम भाकरीबरोबर छानच लागते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree More
Jan-29-2018
Jayshree More   Jan-29-2018

Mouth watering

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर