मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक चिकन ग्रेवी

Photo of Palak Chicken Gravy by Aarti Nijapkar at BetterButter
1278
7
0.0(0)
0

पालक चिकन ग्रेवी

Jan-31-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक चिकन ग्रेवी कृती बद्दल

चिकन हा बहुतांशी खवय्यांचा आवडता विषय आणि माझा सुद्धा तर असेच वेगवेगळ्या चिकन चे पदार्थ बनवत असते काही ठिक तर काहींचा तर जवाबच नसतो त्यातील एक ही रेसिपी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पालक चिकन ग्रेवी चला तर साहित्य वा कृती बघूयात.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन ५०० ग्रॅम
  2. पालक जूडी १ मोठी
  3. कांदे ३ मोठे
  4. टोमॅटो १ मोठा
  5. आल , लसूण पेस्ट २ मोठे चमचे
  6. कोथिंबीर,हिरव्या मिरच्या,जिरे पेस्ट १ मोठा चमचा
  7. लाल तिखट २ मोठे चमचे
  8. हळद १ लहान चमचा
  9. धने पावडर १ १/२ मोठा चमचा
  10. गरम मसाला १ मोठा चमचा
  11. तेल ४ मोठे चमचे
  12. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. सर्व प्रथम चिकन धूवून बाजूला ठेवून द्या
  2. पालक पाण्यात स्वच्छ धूवून मग कापून घ्या
  3. कांदे , टोमॅटो , कोथिंबीर चिरुन घ्या
  4. आता पातेल घ्या त्यात तेल टाकून तापवून घ्या
  5. प्रथम कांदे व्यवस्थित परतवून घ्या व जास्त लालसर करु नये
  6. आता टोमॅटो घालून पुन्हा चांगल परतवून घ्या व मीठ स्वादानुसार घाला
  7. आल-लसूण पेस्ट आणि हिरवी पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित परतवून घ्या खमंग आला पाहिजे
  8. मिश्रण शिजल्यावर बाजूनी तेल सुटेल
  9. मग मिश्रण परतवून चिरलेली कोथिंबीर घाला
  10. आता सर्व सूखे मसाले व हळद घाला व मिश्रण एकजीव करुन घ्या
  11. आता चिकनचे तूकडे घाला
  12. चिकन व मसाला एकजीव करुन घ्या
  13. चिरलेली पालक चिकन वर घाला व झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या
  14. अश्या प्रकारे पालक घाला. खालीवर करु नये ६ ते ८ मि. मंद आचेवर झाकण ठेवून वाफवून घ्या
  15. मग मिश्रण एकजीव करुन घ्या हवं असेल तर पाणी घाला तसे पाण्याची गरज लागत नाही
  16. चिकन शिजल्यावर आच बंद करा
  17. गरमागरम गरम पालक चिकन ग्रेवी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर