मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ

Photo of Fresh Cashew Nut Curry by Purva Sawant at BetterButter
1845
8
0.0(0)
0

ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ

Feb-02-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ कृती बद्दल

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. माझी आहे हि मालवणी पद्धत.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. ओले काजू, सोललेले - २ कप 
  2. बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक, भाजी पुरेशी होण्यासाठी घालावा.)   
  3. कांदा,  चिरून- १ मध्यम 
  4. भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ टेबलस्पून
  5. आले लसूण वाटण- २ टीस्पून
  6. हळद- १/२ टीस्पून 
  7. मालवणी मसाला-३ टीस्पून
  8. गरम मसाला-१ टीस्पून
  9. मीठ- चवीनुसार
  10. तेल- ३ ते ४ टेबलस्पून
  11. कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर

सूचना

  1. काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  2. बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत.
  3. एका कढईत तेल गरम करून कांदा तपकिरी रंगावर परतून घ्यावा.
  4. हिंग, हळद आणि मसाला टाकून काही  वेळ परतावा. 
  5. त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं
  6. त्यात काजू, बटाट्याचे तुकडे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
  7. त्यात गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी.
  8. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
  9. कोथिंबीर टाकून भांडे उतरावे. 
  10. चपाती किंवा भाकरी सोबत गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर