मुख्यपृष्ठ / पाककृती / ताकाची कढी

Photo of Kadhi khichdi n khandeshi khudaa bhakri by Teesha Vanikar at BetterButter
1486
3
0.0(0)
0

ताकाची कढी

Feb-02-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताकाची कढी कृती बद्दल

ताकपासून बनवलेली कढी सोबत आमचा खान्देशी"खुडा"ज्याला ठेचा ही म्हणतात, व भाकरी असे पुर्ण जेवण.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ताक १//२ ली.
  2. बेसन ४ चमचे
  3. मिरच्या ५
  4. लसुण पाकळ्या ६
  5. आल्याचा तुकडा
  6. जीरे मोहरी मिक्स १ चमचा
  7. गुळ
  8. कढीपत्याची पाने ७/८
  9. हिंग
  10. १ तमालपत्र
  11. ४ लवंग
  12. २ चमचे तूप
  13. तकाच्या निम्मे पाणी
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. १)प्रथम मिरच्या व आल लसूण मिक्सर मधुन वाटुन घ्यावे.
  2. २)ऐका खोलगट भांड्यात ताक,बेसन घेऊन रवीने घोटुन घ्या.
  3. ३) ताकत ऐकपण गुठळी होता कामा नये.
  4. ४) पातेली गॅसवर गरम करायला ठेवा.
  5. ५) त्यात तूप टाकावे,व जीरे मोहरी टाकावी.
  6. ६)जीरे, मोहरी तडतडली की मग हिंग, कढीपत्ता, तमालपत्र,लवंग घालून चांगले परतावे.
  7. ७) छान फोडणीचा सुगंध आल्यावर गॅस सीम करुन ताकाचे मिश्रण फोडणीत हळुच ओतावे.
  8. ८) कढीत आता गुळ घालून २ मी. ढवळा. ९) कढीला उकळी आली की लगेच गॅस बंद करावा चवीनुसार मीठ घालुन, कोथिंबीर बारीक चिरून घाला.
  9. १०) कढी तय्यार आहे खिचडी किंवा खुडा भाकरीसोबत खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर