मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन वड्यांची भाजी

Photo of Soyabin bhaji by Maya Ghuse at BetterButter
2042
7
0.0(0)
0

सोयाबीन वड्यांची भाजी

Feb-05-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन वड्यांची भाजी कृती बद्दल

सोयाबीन वडीची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी सोयाबीनच्या वड्या
  2. तेल अर्धी वाटी
  3. कांदा 1
  4. आलं-लसूण पेस्ट 1चमचा
  5. 1 टमाटे चिरून
  6. खोबरं अर्धी वाटी
  7. तिखट 3चमचे
  8. हळद अर्धा चमचा
  9. धना पावडर 1 चमचा
  10. गरम मसाला 1चमचा
  11. कांद्याची पात चिरून 1चमचा
  12. कोथिंबीर
  13. मोहरी, जिरं 1-1चमचा
  14. मीठ

सूचना

  1. सोयाबीनच्या वड्या पाण्यात भिजत घातल्या 10-12 मी.
  2. नंतर दाबून त्यातले पाणी काढून टाकलं
  3. तव्यावर 1चमचा तेल टाकून वड्या परतवून घेतल्या
  4. कांदा चिरून एका पातेल्यात 1 चमचा तेलात परतवून मिक्सरच्या भांड्यात काढला
  5. तसेच खोबरं परतवून मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेतले
  6. एका पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं टाकले, नंतर कांद्याची पात टाकली
  7. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळदं, धना पावडर, गरम मसाला टाकून परतले, नंतर टमाटे चिरून टाकले
  8. तेल सूटू लागल्यावर त्यात सोयाबीनच्या वड्या परतवून घेतल्या
  9. थोडे पाणी टाकून उकळी घेतली
  10. कोथिंबीर घालून वाढली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर