मुख्यपृष्ठ / पाककृती / आलू टिक्की चाट

Photo of Aloo Tikki Chaat by Pavani Nandula at BetterButter
37683
626
4.5(0)
3

आलू टिक्की चाट

Feb-24-2016
Pavani Nandula
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू टिक्की चाट कृती बद्दल

मसालेदार अन्न चमचमीत चण्याच्या रश्याबरोबर वाढले जाणारे चविष्ट असे बटाटे-मटरचे पॅटीस, त्यावर कुरकुरीत शेव आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या पुदिना आणि चिंचेच्या चटण्या! या डिशमध्ये भरपूर प्रकारचे स्वाद मिळतात. सर्व चाट प्रेमींनी खाल्लेच पाहिजे असा प्रकार. ही पाककृती तरला दलाल यांच्या साईटवरून घेतली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे - 2 मध्यम आकाराचे उकडलेले, सोललेले आणि कुस्करलेले
  2. हिरवे वाटाणे - 1/2 वाटी
  3. काळे जिरे - 1/2 लहान चमचा
  4. जिरे - 1 लहान चमचा
  5. हिरव्या मिरच्या - 2-3, बारीक चिरलेल्या
  6. कोथिंबीर - 2 मोठे चमचे बारीक चिरलेली
  7. मक्याचे पीठ - 1 मोठा चमचा
  8. शिजवलेले छोले - 2 वाट्या
  9. 1 लहान कांदा बारीक चिरलेला
  10. 1-2 हिरव्या मिरच्या, मधून चिरलेल्या
  11. धणेपूड - 1 लहान चमचा
  12. जिरेपूड - 1 लहान चमचा
  13. लाल तिखट - 1 लहान चमचा (स्वादानुसार घालू शकता)
  14. आमचूर पावडर - 1 लहान चमचा
  15. गरम मसाला - 1/2 लहान चमचा
  16. टोमॅटो प्युरी - 2 मोठे चमचे (किंवा 1 कच्चा टोमॅटो)
  17. मिरपूड आणि मीठ - स्वादानुसार
  18. शेव - वाढण्यासाठी
  19. खजूर चिंचेची चटणी - वाढण्यासाठी
  20. हिरवी चटणी - वाढण्यासाठी
  21. फेटलेले दही - वाढण्यासाठी
  22. लाल कांदा - सजविण्यासाठी

सूचना

  1. छोले बनाविण्यासाठी एका कढईत 2 लहान चमचे तेल गरम करा. त्यात कांदा घालून 2-3 मिनिटे किंवा पारदर्शक होईपर्यंत परता. त्यात धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, आमचूर पावडर, गरम मसाला आणि 1 कप पाणी घाला. चांगले मिसळा आणि 1-2 मिनिटे शिजवा.
  2. आता टोमॅटोची प्युरी घालून 2-3 मिनिटे शिजवा, अधूनमधून हलवित रहा.
  3. नंतर शिजवलेले छोले, मीठ आणि मिरपूड घालून हलवा आणि 4-5 मिनिटे शिजवा. छोले मॅशरने हलके कुस्करा. वाढण्यासाठी तयार होईपर्यंत बाजूला ठेवा.
  4. आलू पॅटीस बनविण्यासाठी : एका कढईत 2 लहान चमचे तेल गरम करा, त्यात काळे जिरे आणि जिरे घाला. तडतडायला लागले की त्यात हिरव्या मिरच्या घाला आणि थोड्या मिनिटांसाठी परता.
  5. एका मोठ्या वाडग्यात कुस्करलेले बटाटे, हिरवे वाटाणे, कोथिंबीर, मक्याचे पीठ, मीठ आणि फोडणी मिळवा. एकजीव केल्यावर 8 सारखे भाग करा. नंतर प्रत्येक भागाला गोळा असा चपटा आकार देऊन टिक्की बनवा.
  6. एका नॉनस्टीक तव्यावर तेल गरम करा आणि त्यात या टिक्क्या दोन्ही बाजूने तपकिरी होईपर्यंत परता, प्रत्येक बाजू सुमारे 2-3 मिनिटे परतून घ्या.
  7. वाढण्यासाठी : वाडग्यात 2 टिक्की ठेवा त्यावर थोडे छोले, शेव, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला. आणि ताबडतोब वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर