मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रोकोली मसाला

Photo of Broccoli masala by Aarti Nijapkar at BetterButter
716
4
0.0(0)
0

ब्रोकोली मसाला

Feb-10-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रोकोली मसाला कृती बद्दल

ब्रोकोली मसाला आज आपण बनवणार आहोत , घरच्याघरी अप्रतिम अशी चविष्ट रेसिपी करणार आहोत , ह्याची ग्रेव्ही फार महत्वाची आहे , चला तर बघून घेऊ साहित्य व कृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रोकोली १०० ग्रॅम
  2. तेल २ मोठे चमचे
  3. कांदा २ मध्यम
  4. टोमॅटो ३ ते ४ मोठे
  5. काजू ७ ते ८
  6. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  7. टोमॅटो केचप २ मोठे चमचे
  8. गरम मसाला १ लहान चमचा
  9. लाल तिखट १ मोठा चमचा
  10. धणेपूड १ लहान चमचा
  11. जिरे पूड १ लहान चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. बटर १ मोठा चमचा
  14. पाणी १ कप

सूचना

  1. ब्रोकोली कापून पाण्यात ब्लँच करून घ्या म्हणजे पाण्यात उकळवू नका पाणी गरम करा उकळी आली की थोड मीठ घाला मग ब्रोकोली घाला २ ते ३ सेकंद साठी आणि गर पाण्यात ठेवून ध्या
  2. मसाला करण्याची कृती
  3. टोमॅटो ला पुढच्या बाजूला सुरीने थोडी चीर मारून घ्या
  4. मग कांदे सोलून त्याचे चार भागात कापून घ्या
  5. आता टोमॅटो , कांदा आणि काजू पाण्यात उकळून घ्या ६ ते ७ मिनिटे मग पाण्यातून काढून गार करून घ्या
  6. मिक्सर मध्ये चांगली बारीक पेस्ट करून घ्या गरज असेल तर थोडं पाणी घाला पण गरज लागणार नाही
  7. आता खोलगट कढई किंवा पातेलं घ्या त्यात तेल घाला मग वाटलेली टोमॅटो पेस्ट व आलं - लसूण पेस्ट घालून चांगलं परतवून घ्या १० ते १२ मिनिटे तेल सुटेपर्यंत भाजा टोमॅटो केचप ,मीठ व हळद घालून परतवून घ्या ४ ते ५ मिनिटे
  8. आता लाल तिखट , गरम मसाला , धने पूड , जिरे पूड व बटर घालून मसाला पुन्हा चांगलं भाजून घ्या आता मसाल्याचा खमंग सुटेल मंद आचेवर ठेवून ध्या
  9. ब्रोकोली तेलात थोडा परतवून घ्या
  10. मसाल्यात ब्रोकोली घाला व हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घ्या
  11. मग २ मिनिटे वाफवून आच बंद करा आणि गरमागरम ब्रोकोली मसाला तयार आहे
  12. ब्रोकोली मसाला रोटी , नान , चपाती सोबत खाऊ शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर