Photo of Stuffed Pomfret Curry by Nayana Palav at BetterButter
1143
12
0.0(4)
0

Stuffed Pomfret Curry

Feb-11-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Stuffed Pomfret Curry कृती बद्दल

ही पाककृती माझे संशोधन आहे. पापलेटमध्ये हिरवी चटणी भरून ते तव्यात तेलावर भाजून घेतले. नेहमी पापलेटचे सार बनवतो, तसे बनवून त्या सारात हे पापलेट घातले. यात मी लसणाची पात (हिरवा लसूण) वापरली आहे. हिरव्या लसूणाचा हंगाम चालू आहे. म्हणून या सारात हिरवा लसूण घातला आहे. Pomfret हा शब्द पोर्तुगीज Pampo या शब्दापासून तयार झाला आहे. अप्रतिम चवीचे सार कसे करतात याची कृती मी तुम्हाला सांगते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • गोवा
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पापलेट छोटी ६
  2. हळद १ टीस्पून (पापलेटला लावणयासाठी व फोडणी साठी)
  3. मीठ ( आवश्यकतेनुसार)
  4. कोकम ८ पाकळया
  5. कांदा १
  6. लसूण ६ पाकळया
  7. हिरवा लसूण ४ पाकळया (हिरवी पात असलेला)
  8. हिरव्या मिरच्या २ (कमी तिखट असलेल्या)
  9. ओले खोबरे १/२ वाटी
  10. सुकलेल्या लाल मिरच्या ६
  11. धणे १ टेबलस्पून
  12. तिरफळ ४
  13. तांदूळ पीठ २ टेबलस्पून
  14. कोंथिबीर मुठभर
  15. तेल ५ टेबलस्पून ( तळण्यासाठी व फोडणीसाठी )

सूचना

  1. पापलेट स्वच्छ धुवून घ्या.
  2. पापलेट मी बाजारातून कापून आणली होती.
  3. मीठ, हळद, आल लसूण पेस्ट १ टीस्पून, कोकम लावून बाजूला ठेवा.
  4. आता हिरव्या मिरच्या २ चमचे ओले खोबरे, लसूण, हिरवा लसूण, कोथींबीर व मीठ, हे सगळ मिक्सरच्या भांडयात घेउन, चटणी वाटून घ्या.
  5. आता ही हिरवी चटणी पापलेटला चिरा देउन त्यात भरा.
  6. आता हे भरलेले पापलेट तव्यावर थोडे तेल घालून तांदूळ पीछ लावून भाजून घ्या.
  7. परतून दुसरया बाजूने भाजून घ्या.
  8. आता सुक्या लाल मिरच्या, धणे पाण्यात भिजत घाला.
  9. मिरच्या, धणे भिजून मऊ झाले की मिक्सरच्या भांडयात घ्या.
  10. मिरच्या, धणे, लसूण, थोडा कांदा, ओले खोबरे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  11. आता एक भांडे गॅस वर ठेवा, गरम झाले की त्यात तेल घाला.
  12. हिंग, हळद, मोहरी, लसूण याची फोडणी करा.
  13. बारीक चिरलेला कांदा घाला.
  14. कांदा गुलाबी झाला की, वाटलेले लाल मिरचीचे वाटण यात घाला.
  15. थोडे पाणी, कोकम, मीठ व तिरफळ घाला.
  16. उकळी आली की यात पापलेट घाला.
  17. जरा शिजू दया.
  18. तयार आहे तुमचे पापलेटचे सार.
  19. भात, चपाती, भाकरी सोबत गरम गरम वाढा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Superb

Mahi Mohan kori
Feb-15-2018
Mahi Mohan kori   Feb-15-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर