मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू बटर मसाला

Photo of Kaju butter masala by Ajinkya Shende at BetterButter
922
3
0.0(0)
0

काजू बटर मसाला

Feb-11-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू बटर मसाला कृती बद्दल

Rich indian main course cashewnut dish prepared in onion tomato gravy

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ मध्यम आकारचे कांदे
  2. २ मध्यम आकारचे टोमॅटो
  3. काजू १०० ग्रॅम
  4. खडा मसाला(२ लवंगा,२ काळी मीरी,२ हीरवी वेलची,छोटा दालचीनी तुकडा,तेजपत्ता)
  5. लसुण ७-८ पाकळ्या
  6. आलं साधारण अर्धा चमचा मध्यम आकाराचे तुकडे करुन
  7. बटर
  8. लाल मिर्ची पावडर
  9. धणा जीरा पावडर
  10. हळद
  11. गरम मसाला
  12. किचन किंग मसाला
  13. फ्रेश क्रीम
  14. कसूरी मेथी
  15. मीठ
  16. कोथिम्बीर
  17. पनीर गार्निशिंग साठी

सूचना

  1. प्रथम एका पॅन मधे पाणी उकळत ठेवा.
  2. नंतर टोमॅटो ला चिरा देवून त्यात तेजपत्ता सोडून सर्व खडा मसाला व आलं आणि लसुण टाका.
  3. पाणी गरम झाल्यावर त्यात १०-१२ काजू, कांदे व टोमॅटो झाकण ठेवून व्यवस्थित शिजवुन घ्या.
  4. व्यवस्थित शिजल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सर मधून ह्याची स्मूथ पेस्ट करुन घ्या.
  5. नंतर पॅन मधे २ चमचे बटर टाकून त्यात उरलेल्या काजू चे २ भाग करुन ते बटर वर लालसर होईपर्यंत परतवुन घ्या व एका प्लेट मधे काढून ठेवा.
  6. नंतर त्याच पॅन मधे अजुन थोडं बटर टाकून कांदा टोमॅटो पेस्ट ४-५ मिनिट मध्यम आचेवर परतवुन घ्या.
  7. नंतर हयात १ चमचा लाल मिर्ची पावडर,पाव चमचा हळद,अर्धा चमचा किचन किंग मसाला व साधारण पाऊण चमचा धाणा जीरा पावडर टाकून तेल सुतेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्या.
  8. हयानंतर हयात थोडं पाणी व चवीप्रमाणे मीठ टाकून पाणी व कांदा टोमॅटो पेस्ट एकजीव होईपर्यंत शिजवुन घ्या.
  9. नंतर हयात काजू,२ चमचे फ्रेश क्रीम,१ चमचा बटर,अर्धा चमचा गरम मसाला,थोडी कसूरी मेथी व थोडी बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून पुन्हा २ मिनिट शिजवुन घ्या.
  10. सर्विंग बाऊल मधे भाजी काढून वरून थोडं फ्रेश क्रीम,थोडं किसलेलं पनीर व थोडी कोथिम्बीर टाकून गार्निशिंग करुन काजू बटर मसाला गरम सर्व करा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर