Photo of Bharli vangi by Geeta Koshti at BetterButter
1991
18
0.0(1)
0

Bharli vangi

Feb-14-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. साहित्य-
  2. ६ ते ८ छोटी वांगी १/२ ते ३/४ कप खवलेला ओला नारळ
  3. ३ ते ४ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  4. १ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार १ टीस्पून तिळ
  5. १/२ टीस्पून जिरेपूड १/२ टीस्पून धनेपूड
  6. २ टीस्पून गोडा मसाला
  7. २-३ टीस्पून किसलेला गूळ ३ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
  8. फोडणीचे साहित्य :
  9. ३ टेस्पून तेल
  10. १/८ टीस्पून मोहोरी
  11. १/४ टीस्पून हिंग,
  12. १/४ टीस्पून हळद , चवीपुरते मीठ

सूचना

  1. भाजी
  2. भाजी कृती:
  3. सारणासाठी नारळ, शेंगदाण्याचा कूट, तिळ, गोडा मसाला, लाल मिरच्या एकत्र करावे.
  4. वाटल्यास मिक्सरमध्ये बारीक करावे म्हणजे सारण मिळून येईल
  5. चिंचेच्या कोळात किसलेला गूळ घालून मिक्स करावे.
  6. गूळ विरघळला कि ते मिश्रण सारणात घालावे. मिठ, जिरेपूड घालावी
  7. वांगी स्वच्छ धुवून त्याच्या दांड्या बघाव्यात, जर त्यावर काटे असतील तर काटे कापून टाकावे.
  8. वांग्याला वरून अधिक चिन्हासारखे काप द्यावेत, पण पूर्ण कापून फोडी करू नयेत. कारण आपल्याला वांग्यात सारण भरायचे आहे
  9. कढईत ३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, थोडे लाल तिखट घालून फोडणी करावी
  10. सारण वांग्यात भरावे. थोडे सारण ग्रेव्हीसाठी बाजूला काढून ठेवावे.
  11. बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही घालावी
  12. थोडे पाणी घालावे पाण्यात थोडे मिठ घालावे ज्यामुळे वांग्याच्या आत थोडे मिठ मुरेल. अलगदपणे भरलेली वांगी घालावीत.
  13. झाकण ठेवून मध्यम आचेवर उकळी काढावी. मधेमधे वांगी पलटावीत. तसेच गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालावे
  14. सुरीने वांगी शिजली आहेत कि नाही हे तपासून घ्यावे वांगी नीट शिजली कि भाकरी किंवा पोळीबरोबर खावी .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-14-2018
BetterButter Editorial   Feb-14-2018

Hi Geeta, ALL Your RECIPES are currently hidden from public view. Kindly mention the STEPS under the option HOW to MAKE and NOT in the Ingredient list. Please edit and mention it in the correct format. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर