मुख्यपृष्ठ / पाककृती / येसूर/काळ तिखट

Photo of Yesur/Kara Masala by Archana Lokhande at BetterButter
5966
4
0.0(0)
0

येसूर/काळ तिखट

Feb-18-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

येसूर/काळ तिखट कृती बद्दल

येसूर यालाच काळ तिखट म्हणतात. काहीजण यालाच काळा मसाला म्हणतात. हा मसाला आजी,पणजी पासून बनवतो.वर्षभरासाठी बनवून ठेवतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 4

  1. लवंगी मिरची ५०० ग्रँम
  2. शंकेश्वरी २०० ग्रँम
  3. किसलेले खोबरे २५० ,ग्रँम
  4. धने २०० ग्रँम
  5. दालचिनी १० ग्रँम
  6. लवंग १० ग्रँम
  7. काळे मिरे १० ग्रँम
  8. कर्णफुले १० ग्रँम
  9. नागकेशर १० ग्रँम
  10. मसाला वेलची १० ग्रँम
  11. त्रिफळा १० ग्रँम
  12. दगडफुल १० ग्रँम
  13. तमालपत्र १० ग्रँम
  14. मायपत्री १० ग्रँम
  15. शहाजिरे १० ग्रँम
  16. सुंठ १० ग्रँम
  17. हाळकुंट ३० ग्रँम
  18. जायफळ १ नग
  19. जिरे ३० ग्रँम
  20. मोहरी ३० ग्रँम
  21. खसखस ३० ग्रँम
  22. पांढरे तिळ ३० ग्रँम
  23. हिरवी वेलची १० ग्रँम
  24. बडीशेप ३० ग्रँम
  25. मीठ १५० ग्रँम
  26. ४-५ मोठे कांदे कापून उन्हात वाळवलेले
  27. तेल
  28. लसूण ५० ग्रँम

सूचना

  1. मिरचे देढ काढून निवडूण घेतले.
  2. प्रथम तिळ,खसखस आणि मोहरी वेगवेगळी मंद गँसवर भाजून काढून घेतली.
  3. बडीशेप, जिरे भाजून घेतले.
  4. दोन चमचे तेल घालून धने भाजून घेतले.
  5. खोबरे थोडेसे लालसर भाजून घेतले.
  6. दगडफुल भाजुन घेतले.
  7. एक चमचा तेल घालून तमालपत्र भाजून घेतले.
  8. चार चमचे तेल गरम करून हाळकुंट,सुंठ,जायफळ फुलेपयँत भाजून घेतले.
  9. नंतर सुकलेला कांदा आणि लसूण सुध्दा तेलावर भिजून घेतला.
  10. आणखी एक चमचा तेल घालून मिरच्या फक्त भाजून घेतल्या. त्या काळपट करायच्या नाहीत.
  11. नंतर तळलेले आणि भाजलेले मसाले व बारीकचा सर्व मसाला एकत्र करून घेतला.
  12. भाजलेल्या मिरच्या, सर्व मसाले आणि मीठ सर्व कांडप घेऊन जाऊन कुटून/दळून आणला.
  13. तयार झाला वर्षभराचा येसूर/काळ तिखट/काळा मसाला वापरायला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर