Photo of Chavali usal by Ajinkya Shende at BetterButter
1149
9
0.0(0)
0

चवळी उसळ

Feb-19-2018
Ajinkya Shende
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळी उसळ कृती बद्दल

प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी चवळी(कूकर मधे ३ शिटया घेवून चवळी वाफवुन घेणे)
  2. १ मोठा कांदा
  3. १ मध्यम आकाराचा टोमॅटो
  4. पाव वाटी किसलेलं खोबरं
  5. ७-८ पाकळ्या लसुण
  6. छोटा तुकडा आलं
  7. १ चमचा डाळ्या
  8. तेल
  9. जीरं
  10. मोहोरी
  11. हींग
  12. कढीपत्ता
  13. मीठ
  14. कांदा लसुण मसाला १ चमचा
  15. लाल मिर्ची पावडर १ चमचा
  16. हळद पाव चमचा
  17. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
  18. कोथिम्बीर

सूचना

  1. प्रथम कांदा,टोमॅटो,खोबरं,डाळ्या,आलं,लसुण हे सर्व जिन्नस मिक्सर मधे वाटून घ्यावे.
  2. नंतर पॅन मधे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात चिमुटभर हींग,जीरं,मोहोरी व कढीपत्ता टाकून अर्धा मिनिट परतवुन घ्यावे.
  3. नंतर तेलात तयार वाटण टाकून थोडं परतवुन त्यात लाल मिर्ची पावडर,कांदा लसुण मसाला,हळद व धणा जीरा पावडर टाकून तेल सुटेपर्यंत परतवुन घ्यावे.
  4. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी,थोडी कोथिम्बीर व चवीनुसार मीठ टाकून उसळ व्यवस्थित एकजिव होईपर्यंत मध्यम आचेवर उकळू द्यावी.
  5. तयार उसळ सर्विंग बाऊल मधे काढून वरून थोडी कोथिम्बीर व आवडत असल्यास थोडा लिम्बु टाकून भात किंवा कोणत्याही भाकरी सोबत सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर