Photo of Oats upma by Indrani Sarma at BetterButter
4546
76
4.5(0)
0

ओट्स उपमा

Mar-02-2016
Indrani Sarma
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स उपमा कृती बद्दल

ओट्स भरपूर रेषा आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध अशा ओट्सनी अशी एक आरोग्यदायी भारतीय न्याहारी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. ओट्स 1 कप
  2. चिरलेल्या भाज्या (गाजर, भोपळा मिरची, फरसबी) 1/2 वाटी
  3. चिरलेला कांदा 1/4 वाटी
  4. मोहरी 1/2 लहान चमचा
  5. जिरे 1/2 लहान चमचा
  6. कडीपत्त्याची पाने 7
  7. भाजलेली जिरेपूड 1 लहान चमचा
  8. पाणी 3/4 कप
  9. चणा डाळ 1 लहान चमचा
  10. चिरलेले आले 1 लहान चमचा
  11. मीठ स्वादानुसार
  12. तेल 2 मोठे चमचे
  13. किसलेले खोबरे 2 मोठे चमचे
  14. थोडी कोथिंबीरीची पाने
  15. चिरलेल्या हिरव्या मिरच्या 2

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करा, त्यात जिरे, मोहरी आणि चणा डाळ घाला.
  2. आता त्यात चिरलेल्या मिरच्या, कांदा, भाज्या, कडीपत्ता घालून परता. भाजलेली जिरेपूड, मीठ आणि आले घाला. त्यात पाणी घाला. मिश्रण झाका आणि ओलावा येण्यासाठी कमी आचेवर शिजवा.
  3. नंतर झाकण काढून त्यात ओट्स घाला आणि काही वेळ परता. पुन्हा झाकण लावा आणि उपमा तयार होण्याची वाट पहा. झाकण उघडा आणि किसलेले खोबरे घालून हलवा.
  4. कोथिंबीरीने सजवा आणि वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर