Photo of Shengole by Rohini Rathi at BetterButter
4739
8
0.0(0)
0

शेंगोळे

Feb-19-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगोळे कृती बद्दल

थंडीची चाहूल लागली की शेंगुळ यांची हमखास आठवण येते नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते करायला अतिशय सोपे व पटकन होणारे शेंगोळे स्वादिष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कुळीथाचे पीठ तीन कप
  2. बेसन पीठ अर्धा कप
  3. दाण्याचा कूट पाव कप
  4. पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या
  5. लाल मिर्ची पावडर दोन टेबल स्पून
  6. हळद अर्धा टीस्पून
  7. तेल दोन टेबल स्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. सर्वप्रथम कुळथाचे पीठ बेसन पीठ वाटलेला लसूण एक चमचा तेल हळद हिंग लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ व अगदी थोडेसे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे
  2. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत
  3. व त्याची जलेबी बनवून घ्यावी
  4. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व लाल मिरचीची पावडर व बारीक केलेला लसूण घालून फोडणी द्यावी
  5. नंतर त्यात अंदाजे पाणी व मीठ घालून एक उकळी आणून घ्यावी
  6. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावे
  7. साधारण दहा ते बारा मिनिटाने खमंग वास घर भर वास दरवळू लागेल
  8. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या घ्याव्या
  9. शेंगोळ्या छोटासा तुकडा खाऊन पाहावा सहजी तुकडा सुटायला हवा थोडेसे कच्चट वाचली वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे
  10. शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम शेंगोळ्या वर तेल घालून वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर