Photo of Dashmi (Tikhat) by Aarti Nijapkar at BetterButter
4376
3
0.0(0)
0

दशमी (तिखट)

Feb-22-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दशमी (तिखट) कृती बद्दल

दशमी पोळी ही आपल्या महाराष्ट्रात सर्वांची आवडती आहे . खरं तर ही दशमी पोळी ३ ते ४ दिवस राहते आपण आपल्या सोबत प्रवासात नेऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचं पीठ १ वाटी
  2. चण्याच पीठ १/२ वाटी
  3. तेल १ मोठा चमचा
  4. हिंग १/२ लहान चमचा
  5. लाल तिखट १ लहान चमचा
  6. धने जिरे पावडर १ लहान चमचा
  7. हळद १/४ लहान चमचा
  8. मीठ स्वादानुसार
  9. तेल तव्यावर भाजण्यासाठी

सूचना

  1. गव्हाचं पीठ व चण्याच पीठ (बेसन) परातीत एकत्र करून घ्या
  2. आता सर्व साहित्य म्हणजे लाल तिखट, हिंग ,मीठ, धने जिरे पावडर, हळद, व तेल घालून पीठ एकजीव करून घ्या
  3. आता गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या व ३ ते ४ मिनिटे ठेवून द्या
  4. मग गोळे करून लाटून घ्या थोडे जाडसर ठेवले तरी चालतील
  5. तवा गरम करून घ्या दोन्ही बाजूस तेल लावून भाजून घ्या
  6. सर्व दशम्या करून व्यवस्तीत भाजून घ्या दह्यासोबत व चटणी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर