Photo of Modak aamti by लेखा औसरकर at BetterButter
971
8
0.0(11)
0

Modak aamti

Feb-23-2018
लेखा औसरकर
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी चनाडाळ पीठ व पाव वाटी गहू पीठ
  2. 1 कांदा
  3. 4 ते 5 पाकळ्या लसूण
  4. 1/2 वाटी किसलेले खोबरे
  5. 4 चमचे तीळ
  6. 3 चमचे खसखस
  7. 1 चमचा जिरे व मोहरी
  8. 3 चमचे तिखट
  9. 1 चमचा गरम मसाला
  10. 1/4 हळद
  11. हिंग
  12. मीठ
  13. तेल
  14. खोबरे व कांदा लसुण मिरची कोथिंबीर वाटण
  15. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम दोन्ही पीठ पाणी व थोडे तेल टाकून मळून घ्या व बाजुला ठेवुन द्या
  2. खोबरे,खसखस,तिळ,जीरे , तिखट, हळद,गरम मसाला हिंग ,मीठ चवी नुसार हे सर्व एकत्र करणे हे झाले मोदकाचे तिखट सारण
  3. भिजवलेल्या पिठाच्या लहान पुरी लाटून घ्या व त्यात सारण भरून छान मोदक करुन घेणे.
  4. सर्व मोदक करुन झाल्या नंतर ते झाकून ठेवा.
  5. आता आमटीची तयारी गँस वर एक पातेले गरम करण्यासाठी ठेवावे व त्यात चार चमचे तेल टाकावे. त्यात मोहरी जीरे व हिंगाची फोडणी करावी त्यात बारीक कापलेला कांदा टाकावा. व तो परतवून घ्या नंतर त्यात वाटण व तिखट हळद गरम मसाला सर्व टाकून भाजुन घ्या तेल सुटे पर्यंत परतवून घ्या.
  6. त्यात आमटी साठी तीन ग्लास पाणी टाका. छान उकळवून घ्यात त्यात चवी नुसार मीठ टाका.
  7. आता त्या उकळीत एक एक करत मोदक सोडा व छान शिजू द्या शिजत असताना पाणी कमी झाले तर परत अंदाजाने टाका
  8. मोदक शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  9. मोदकाची आमटी तयार छान गरम गरम भाकरी किंवा पोळी व भाता बरोबर खायला द्या

रिव्यूज (11)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-01-2018
BetterButter Editorial   Mar-01-2018

Hi Preshak, Request you to only share an image of Recipe! Please do not add any text to the recipe image. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

स्मित शिवदास
Feb-24-2018
स्मित शिवदास   Feb-24-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर