मुख्यपृष्ठ / पाककृती / टमाटर रस्सम

Photo of Tomato Rassam by Aarti Nijapkar at BetterButter
820
4
0.0(0)
0

टमाटर रस्सम

Feb-24-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टमाटर रस्सम कृती बद्दल

रस्सम हा साऊथ इंडियन भागातील अतिशय उत्तम अशी पाककृती आहे टोमॅटो आणि चिंचेचं पाणी आणि काही मसाले घालून हा रस्सम तयार केला जातो , तर काही ठिकाणी त्याच्यात तुरीची डाळ घालतात, रस्सम मसाला वापरतात, पण आपण पारंपारिक टमाटर रस्सम बनवणार आहोत हे आपण सूप म्हणून पिउ शकतो , रस्सम भातासोबत खाल्ले जाते , चला तर आपण बनऊयात टमाटर रस्सम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. टमाटर ३ ते ४
  2. चिंचेचा कोळ / पाणी १ मोठा चमचा
  3. तेल १ मोठा चमचा
  4. कडीपत्ता पाने ७ ते ८
  5. मोहरी १ लहान चमचा
  6. जिरे १ लहान चमचा
  7. हिंग १/४ लहान चमचा
  8. लसूण पाकळ्या ३ ते ४
  9. हळद १/४ लहान चमचा
  10. गूळ १ लहान चमचा
  11. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  12. मीठ स्वादानुसार
  13. खालील साहित्य भाजून गार करून पावडर करा
  14. मेथी दाणे ३ ते ४
  15. जिरे १/४ लहान चमचा
  16. लाल सूख्या मिरच्या १ किंवा २

सूचना

  1. प्रथम टमाटर धुवून कापा व कुकरमध्ये टमाटर आणि पाणी घालून ३ ते ४ शिट्या देऊन शिजवून घ्या
  2. चिंच कोमट पाण्यात भिजवत ठेवा मग कुस्करून चिंचेचं पाणी काडून घ्या
  3. आता एक टोपात तेल तापवा मग लसूण , कडीपत्ता ,मोहरी ,जिरे घालून परतावे चांगले तडतडू द्या आता थोडी हिंग घाला
  4. आता टमाटर आणि टमाटर च पाणी फोडणीत घाला
  5. आता हळद , चिंचेचं पाणी , गूळ , तयार केलेला मसाला पावडर , चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या
  6. चांगली उकळी येऊ द्या आता चिरलेली कोथिंबीर घाला चव बघून गॅस बंद करा
  7. टमाटर रस्सम तयार आहे हे
  8. आपण भातासोबत खाऊ शकतो किंवा नुसत असंही सूप म्हणून पिऊ शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर