Photo of Rodage/ panage by pranali deshmukh at BetterButter
3357
9
0.0(1)
0

Rodage/ panage

Feb-24-2018
pranali deshmukh
40 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कि.रवाळ दळलेली कणिक
  2. तेल 1 वाटीभर
  3. मीठ
  4. ओवा

सूचना

  1. गहू चक्कीवरुन रवाळ दळून आणा .रोडग्याची कणिक असं म्हणतात.
  2. गोवऱ्या पेटवा गोवसऱ्यांची आग शमून निखारा हवा असतो रोडग्याला .
  3. तोपर्यंत कणिक मीठ तेल घालून मळून घ्या .कणिक रवाळ असल्यामुळे तिला मुरायला वेळ लागतो .अर्धा तास झाकून ठेवा.
  4. आता कणिक छान तेलाचा तेलाचा हात घेऊन मळून घ्या .एक उंडा घेऊन तळहातावर थापून थापून जाडसर गोल पोळी करा .
  5. परत उंडा घेऊन आधीच्या पोळीपेक्षा छोटी पोळी करा .परत एक उंडा घ्या तिची हातावरच पोळी करून आपण घडीची पोळी करतो तसे त्रिकोणी फोल्ड करा.क्रमाने असे ठेवा.
  6. प्रत्येक पोळीला जरा जास्त तेल लावा .सर्व भाग वरच्या दिशेला जॉईन करा.
  7. वर जुळवल्यावर जरा हातानी प्रेस करा.
  8. अशाप्रकारे सर्व रोडगे बनवून घ्या.
  9. पेटत्या निखाऱ्याच्या ज्वाला शांत झाल्या कि त्यामध्ये रोडगे ठेवा .वरून राखेनी झाकून द्या .
  10. मध्ये मध्ये पलटवून द्या.गरम राखेत हे रोडगे शिजतात .दोन्ही बाजूनी शिजले कि काढून घ्या .कापडांनी पुसून वांग्याच्या भाजीसोबत आणि वारणासोबत पत्रावळीवर वाढा.
  11. रोडग्याचं जे जगरं म्हणजे ज्या गोवऱ्या पेटवल्या जातात त्यामध्ये आधी भाजी ,वरण , भात शिजवला जातो.आणि नंतर राखेमध्ये रोडगे ठेवतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Yogesh Takey
Mar-25-2018
Yogesh Takey   Mar-25-2018

Maharashtrian Dish Awesome...Try it once ...No oil completely hygiene

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर