Photo of Ukadpendi by Archana Lokhande at BetterButter
402
4
0.0(0)
0

उकडपेंडी

Feb-24-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडपेंडी कृती बद्दल

उकडपेंडी ही विर्दभातील एक पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ १ वाटी
  2. तेल ३-४ चमचे
  3. कांदा १ बारीक चिरलेला
  4. हिरव्या मिरच्या ४-५
  5. लसून ६-७ बारीक तुकडे केलेले
  6. हळद १/४ चमचा
  7. लाल तिखट १ चमचा
  8. हिंग १/४ चमचा
  9. मीठ
  10. साखर १/२ चमचा
  11. आमचूर पावडर
  12. पाणी
  13. कोथिंबिर
  14. मोहरी

सूचना

  1. एकीकडे कमी गँसवर पाणी गरम होण्यास ठेवावे.
  2. आता कढईत तेल गरम करून मोहरी घालून तडतडल्यावर मिरची,लसूण घालून परतावे.
  3. नंतर कांदा घालून गुलाबी रंगावर परतून हळद, तिखट, हिंग आणि आमचूर पावडर घालून मिक्स करून पीठ घालून ५-७ मिनीटे भाजून घ्यावे.
  4. नंतर मीठ, साखर आणि थोडी कोथिंबिर घालून मिक्स करून पाणी घालून(पाणी समप्रमाणात घालावे) दोन मिनिटे ठेवून तयार होईल उकडपेंडी.
  5. आता सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार उकडपेंडीची मुठ पाडून म्हणजेच एका वाटीत खाली थोडी कोथिंबिर घालून त्यात उकडपेंडी घालून प्लेटमध्ये वाटी उलटी करणे होय.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर