मुख्यपृष्ठ / पाककृती / कप्याचे घावन

Photo of Kappyache Ghawan by Shilpa Deshmukh at BetterButter
440
3
0.0(0)
0

कप्याचे घावन

Feb-25-2018
Shilpa Deshmukh
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कप्याचे घावन कृती बद्दल

कोकणात सणासुदीला कप्याचे घावन करतात.हे खीर किंवा दुधासोबत खातात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ 2 वाटी,
  2. गूळ किसलेला 1/2 वाटी
  3. खोवलेला नारळ 1 वाटी
  4. वेलची पावडर 1 tbsp

सूचना

  1. तांदूळ धुवून 5 तास भिजत घाला .
  2. भिजल्यावर पाणी निथळून मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या पाणी घालून पातळसर सारण बनवा
  3. खोवलेल्या नारळात गूळ किसून घाला आणि मिक्स करा.
  4. मीठ टाकून मिक्स करा .नॉनस्टिक तव्यावर हे सारण पसरावा तूप सोडा.
  5. घावन झालं कि अर्ध्या बाजूवर नारळ आणि गुळाचं मिश्रण पसरवा
  6. रिकामी बाजू त्याच्यावर पालथी घाला . मग अर्ध्या भागावर परत घावन टाका त्यावर गूळ खोबरं मिश्रण पसरवा.
  7. आधीची बाजू त्यावर झाका .परत सारण अर्ध्या बाजूवर टाका
  8. मिश्रण पसरावा आणि झालं कि दुसरी बाजूने फोल्ड करा
  9. अशाप्रकारे प्रत्येकवेळी करायचं
  10. एक वेळा इकडे आणि दुसरी वेळा विरुध्ध असे टाकायचे आणि गूळ खोबऱ्याचं सारण पसरावायचं .
  11. तुम्हाला हवे तेवढे कप्पे बनवू शकता.
  12. मध्ये मध्ये तूप सोडायचं .
  13. अशाप्रकारे चाकूने तुकडे पाडा .
  14. दूध किंवा खीरीसोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर