मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याची चटणी

Photo of Onion Chutney by Pavithira Vijay at BetterButter
1554
211
4.6(1)
0

कांद्याची चटणी

Mar-14-2016
Pavithira Vijay
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 मध्यम कांदे
  2. 1 मोठा चमचा तेल
  3. 3 लसणाच्या पाकळ्या
  4. 3 सुकलेल्या लाल मिरच्या
  5. 2 मोठे चमचे उडीदडाळ
  6. 1 लहान चमचा चणाडाळ
  7. मीठ आवश्यकतेनुसार
  8. चिंच (आवळ्या इतकी)
  9. फोडणीसाठी:
  10. 1 मोठा चमचा तेल
  11. अर्धा लहान चमचा मोहरी
  12. अर्धा लहान चमचा जिरे
  13. 1 लहान चमचा उडीदडाळ (ऐच्छिक)
  14. एक चिमूटभर हिंग
  15. 2 सुकलेल्या लाल मिरच्या
  16. 1 कडीपत्त्याची पाने असलेली लहान काडी

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात उडीदडाळ आणि चणाडाळ बदामी रंगाचे होईपर्यंत तळा. नंतर त्यात सुकलेल्या लाल मिरच्या आणि लसूण घाला आणि सर्व एकत्र तळा.
  2. नंतर त्यात चिरलेला कांदा घाला, आणि तो मऊ आणि पारदर्शक होईपर्यंत परता. गॅस बंद करा आणि त्याला थंड होऊ द्या.
  3. त्याला वाटण्यासाठी थोडे पाणी घाला. त्यात मीठ आणि चिंच मिसळा आणि सर्व एकत्र वाटा आणि चटणीसारखे जाडसर ठेवा.
  4. फोडणीसाठी, तेल गरम करा. त्यात उडीदडाळ, मोहरी नंतर जिरे, हिंग आणि सुकलेल्या लाल मिरच्या घाला. या फोडणीला चटणीवर घाला आणि मिसळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर