मुख्यपृष्ठ / पाककृती / बैंगन का चोखा

Photo of Baigan ka Chokha by Anjana Chaturvedi at BetterButter
2035
80
4.5(0)
0

बैंगन का चोखा

Jul-29-2015
Anjana Chaturvedi
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • बिहार
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 3 मध्यम टोमॅटो चिरलेले
  2. 3 मोठे वांगे
  3. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  4. 1 लहान चमचा आले चिरलेले
  5. 3 मोठे चमचे कोथिंबीर चिरलेली
  6. अडीच लहान चमचे लिंबाचा रस
  7. 1 लहान चमचा लाल तिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. अडीच मोठे चमचे मोहरीचे तेल

सूचना

  1. वांगे धुवा आणि पुसून त्याचे 2 लहान काप करा, नंतर वांग्यांवर थोडे तेल लावा.
  2. वांगे थेट आचेवर भाजायला ठेवा. सर्व बाजूंनी भाजले जाण्यासाठी बाजू बदलत रहा.
  3. याच प्रमाणे टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या सुध्दा सर्व बाजूंनी आचेवर भाजा.
  4. वांगे आणि टोमॅटो थंड झाले की त्यांचे साल काढा. वांगे आणि टोमॅटो कापा आणि कुस्करा.
  5. एक मोठा वाडगा घ्या आणि त्यात कुस्करलेले वांगे आणि टोमॅटो घाला.
  6. त्यात चिरलेली हिरवी मिरची, आले, मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मोहरीचे तेल घाला.
  7. सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्र करा आणि त्यात चिरलेली कोथिंबीर घाला. ताजे वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर