1687
5
0.0(1)
0

Sprouted Moong Cutlet

Mar-04-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 कप उकडलेले मोड आलेले मुग
  2. 2 उकडलेले बटाटे
  3. 1/2 कप उकडलेले मटार
  4. 2 टेबलस्पून भाजलेले चण्याचे पीठ
  5. 4 हिरव्या मिरच्या ठेचलेल्या
  6. 1 टेबलस्पून आले किसलेले
  7. पाव चमचा हळद, आमचूर पावडर व लाल तिखट
  8. 1 छोटा चमचा धणे पावडर
  9. 2/3 ब्रेड मिक्सरमध्ये चुरा केलेले
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. चवीनुसार मीठ , 2/3 टेबलस्पून तेल

सूचना

  1. मोड आलेले मुग उकळत्या पाण्यात घालून ३-४ मिनीटे उकडून घ्या.मग पाणी काढून चाळा.असेच मटार पण २-३ मिनीटे उकडून चाळून वाडग्यात काढून घ्या.
  2. बटाटे धुवून उकडून घ्या.उकडलेल्या बटाट्यांची साल काढा व मॅश करून ठेवा
  3. मुग मॅश करा. अशा प्रकारे मटार देखील वेगळ्या वाडग्यात मॅश करा.
  4. आता एका परातीत मुग, मटार व बटाटे एकत्र करून त्यात किसलेले आले, ठेचलेली हिरवी मिरची, धणे पावडर, हळद व लाल मिरची पावडर,मीठ,कोथिंबीर , भाजलेलं चण्याच पीठ घालून सगळ्या गोष्टी नीट मिक्स करा.कटलेट बनवायला मिश्रण तयार आहे.
  5. मिश्रणाचे गोळे करून कटलेटचा आकार दयावा कटलेट ब्रेड क्म्बल मध्ये घोळवा.सगळे कटलेट असेच तयार करा, प्लेट मध्ये ठेवा. कटलेट २० मिनीट असेच ठेवा म्हणजे नीट सेट होतील
  6. पॅन मध्ये तेल गरम करून कटलेट शॅलो फ्राय करा थोडे तेल कटलेट च्या वर घाला व दोन्ही बाजुनी ब्राऊन झाल्यावर प्लेट मध्ये काढा. सगळे कटलेट असेच तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sonal Sardesai
Mar-04-2018
Sonal Sardesai   Mar-04-2018

Healthy one

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर