Photo of Vadapav griiled sandwich by Swati Kolhe at BetterButter
801
8
0.0(0)
0

Vadapav griiled sandwich

Mar-13-2018
Swati Kolhe
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 6

  1. सारणसाठी:
  2. उकडलेले बटाटे ५-६
  3. उकडलेले गाजर,मटार १/२ कप
  4. पकलाची पान ६-७
  5. तेल १ tbsp
  6. हिंग २ चिमूट
  7. मोहरी १ tsp
  8. कडीपत्ता ५-६
  9. अद्रक-लसूण पेस्ट १ tbsp
  10. मिरची पेस्ट १ १/२ tbsp
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर
  13. कोटिंगसाठी:
  14. बेसन पीठ १ कप
  15. मिरची पेस्ट १/२ tsp
  16. सोडा २ चिमूटभर
  17. तेल मोहनदेण्यासाठी १-२ tsp
  18. मीठ चवीनुसार
  19. सँडविच बनवण्यासाठी:
  20. ब्रेड आवश्यकतेनुसार
  21. चिरलेला कांदा १/२ कप
  22. चिरलेला टोमॅटो १/२ कप
  23. वडापावची लाल कोरडी चटणी
  24. हिरवी चटणी
  25. चाट मसाला आवश्यकतेनुसार
  26. बटर १/४ कप
  27. चीज(ऑप्शनल)
  28. सजावटीसाठी:
  29. शेव १/२ कप(ऑप्शनल)
  30. कोथिंबीर ४-५ tbsp

सूचना

  1. लोखंडी कढईमध्ये तेल तापवून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ता ची फोडणी द्यावी.
  2. नंतर अद्रक-लसूण व मिरची पेस्ट परतवून घ्यायची.
  3. त्यात पालकाची चिरलेली पान टाकून परतून घ्या.
  4. मग उकडून मॅश केलेले बटाटे, गाजर, मटार घालावे. व मीठ घालून १ वाफ काढावी.
  5. भाजीचे सारण ठीक करायला ठेवायचे तोवर कोटिंग मध्ये दिलेले सर्व साहित्य एकत्र करून बेसनपीठाचा मध्यम घोळ बनवून घ्या.
  6. आता भाजीच्या सारणाचे अप्पे पत्रात मावतील एवढे गोळे करून घ्या.
  7. अप्पे पात्राला तेल लावून घ्यावे.
  8. भाजीचा गोळा बेसनाच्या घोळात बुडवून एक एक करून अप्पे पत्रात ठेवावा.
  9. वडे अप्पे पात्रात थोड्या तेलावर फ्राय करावे.
  10. सँडविच बनवण्यासाठी:
  11. ब्रेड ला हिरवी चटणी लावून वरून लाल चटणी भुरभुरावी.
  12. त्या ब्रेड वर एक किंवा २ जेवढे मावतील तेवढे वडे ठेऊन घ्यावे. वरून कांदा टोमॅटो व थोडा चाट मसाला भुरभुरावा.
  13. आता दुसऱ्या ब्रेड वर हवी असल्यास चटणी लावून नॉनस्टिक तव्यावर बटर ब्रश करून दोनजी बाजूनी सँडविच टोस्ट करून घ्या.
  14. सर्व्ह करते वेळी त्यावर शेव न थोडी कोथिंबीर घालून चटणी सॉस सोबत सर्व्ह करावे.
  15. पार्टी च्या अगोदर वडे, कोटिंग आणि सँडविच चे साहित्य आधीच बनवून ठेवावे. ऐन वेळी फक्त सँडविच सेट करून टोस्ट केले की गरम होतेच, त्यामुळे गरम गरम वडे बनवलेच पाहिजे असे नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर