Photo of Wheat rava kheer by Swati Kolhe at BetterButter
900
8
0.0(1)
0

Wheat rava kheer

Mar-14-2018
Swati Kolhe
2 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. दूध १/२ लिटर
  2. तूप १ tsp
  3. गव्हाचा रवा १ १/२ tbsp
  4. साखर ४ tbsp/ १/३ कप
  5. सुकामेवा २ tbsp
  6. जायफळ/वेलचीपूड २-३ चिमूटभर
  7. व्हॅनिला एसेन्स १-२ ड्रॉप
  8. केशर सजावटीसाठी

सूचना

  1. दूध तापवायला ठेवा.
  2. दुधाला उकळी फुटली की जडबुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर भाजून घ्या.
  3. रवा गुलाबीसर झाला की लागलीच दूध घालायचे व आटू द्यावे.
  4. ३-४ मिनिट आटले की साखर, सुकामेवा घालून ५-१० मिनिट आटवावे.
  5. गॅस बंद केल्यावर जायफळ पूड व केशर घालून मिक्स करून घ्यावे.
  6. खीर थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊन द्यावी.
  7. सर्व्ह करताना वरून सुकामेवा व केशर घालून सर्व्ह करू शकता.
  8. टीप:
  9. ही खीर जास्त घट्ट शिजवायची नसते. थोडी पातळच ठेवायची, थंड झाल्यावर ती आपोआपच घट्ट होते.
  10. मी कधी जयफळपूड, कधी वेलचीपूड तर कधी फक्त व्हॅनिला इसेन्स घालून करते. मला तरी ही खीर व्हॅनिला इसेन्स घालून आवडते अप्रतिम चव लागते.
  11. खीर बनवताना सतत ढवळायची गरज नसते, मधून मधून ढवळायचे. सतत ढवळले की खीर चिकट होते, मधून मधून ढवळले की छान गाठी होतात व त्या थनदी गाठी खायला खूप छान लागते.
  12. थोडी मखाने पावडर घातली तरी छान होते खीर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर