मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मसाला टिक्की

Photo of Shimla masala tikki by Aarti Nijapkar at BetterButter
680
5
0.0(0)
0

शिमला मसाला टिक्की

Mar-22-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मसाला टिक्की कृती बद्दल

शिमला मिरची ही आपण आवडीने खातो पण ह्याच जर वेगळ्या आणि चटकदार अशी पाककृती झाली तर मज्जाच की नाही अशीच आपण पार्टी साठी बनऊयात शिमला मसाला टिक्की

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिमला मिरचीच्या आत भरणासाठी
  2. शिमला मिरची २ 
  3. उकळवून घेतलेले बटाटे २ 
  4. वाफवलेले हिरवे मटार १/२ वाटी
  5. हिरवी मिरची चिरलेली १ ते २
  6. कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे
  7. धने पावडर १ लहान चमचा
  8. जिरे पावडर १ लहान चमचा
  9. गरम मसाला १ लहान चमचा
  10. लाल तिखट १ लहान चमचा
  11. लिंबूचा रस १ लहान चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. ब्रेड क्रम्ब १/२ वाटी
  14. तेल तवा फ्राय करण्यासाठी
  15. टिक्की सोबत खाण्यास  डिप
  16. दही 
  17. चाट मसाला
  18. लाल तिखट
  19. साखर किंचित आवडीनुसार

सूचना

  1. प्रथम शिमला मिरचीचा आतला गर काढून घ्या  वरचा शेंडा सुरीने कापून मग आतला गर लहान चमच्याने काढा.
  2. आता उकळवून घेतलेले बटाटे व वाफावलेलं हिरवे मटार दोन्हीं कुस्करून घ्या
  3. मग त्यात चिरलेली हिरवी मिरची , कोथिंबीर , धने व जिरे पावडर , गरम मसाला , लाल तिखट , लिंबूचा रस मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकजीव करून घ्या 
  4. आता शिमला मिरचीच्या आत हे मिश्रण दाबून भरा जेणेकरून कापताना हे मिश्रण बाहेर निघणार नाही 
  5. आता शिमला मिरचीचे गोलाकार काप करून घ्या गॅस वर तवा तापवून थोडं तेल घालून घ्या
  6. मग कापलेले मिरचीचे काप ब्रेड क्रम्ब मध्ये दोन्ही बाजूने लावून घ्या व मध्यम आचेवर तवा फ्राय करून घ्या सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्या ताटात काढून घ्या
  7. शिमला मसाला टिक्की सोबत खाण्यासाठी लागणारे दही दही , चाट मसाला व लाल तिखट  किंचित साखर घालून फेटून घ्या व चविष्ट शिमला मसाला टिक्की सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर