Photo of Sambarvadi by Pranali Deshmukh at BetterButter
912
8
0.0(0)
0

सांबारवडी

Mar-22-2018
Pranali Deshmukh
30 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांबारवडी कृती बद्दल

आमच्या विदर्भात कोणताही हॉटेल ,कँटीन किंवा चहाची टपरी असो तिथे एक त्रिकुट बघायला मिळतं समोसा ,कचोरी आणि सांबारवडी .आधीचे दोन पदार्थ महाराष्ट्रात सगळीकडे बघायला मिळतात पण अस्सल सांबारवडी खायची असेल तर विदर्भातच यावं लागेल ." सांबर " म्हणजे कोथिंबीर इकडे कोथिंबीरला सांबार म्हणतात .चवीला तिखट ,आंबट आणि थोडी गोड असणारी सांबारवडी दिसायलाही खूप देखणी आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 कप
  2. सुक्या खोबऱ्याचा किस 1 कप
  3. शेंगदाणे कूट 1/2 कप
  4. सांबार बारीक चिरून 1/2 कप
  5. तीळ 2 tbsp
  6. खसखस 2 tbsp
  7. आमचूर पावडर 1 tbsp
  8. साखर 2 tbsp
  9. तिखट 1 tbsp
  10. आचारी मसाला 1 tbsp
  11. तेल 1 कप

सूचना

  1. मैदा गाळून घ्या 2 चमचे तेल आणि मीठ घालून छान मिक्स करा
  2. पाणी घालून घट्ट मळून घ्या .ओला कापड घालून 20 मिनिट झाकून ठेवा .
  3. आता सांबारवडीत भरायचा मसाला तयार करायचा आहे
  4. सुके खोबरे ,खसखस ,तीळ ,वेगवेगळे भाजून घ्या
  5. सांबर 1 चमचा तेलात परतवून घ्या .जस शेंगदाणा कूट नसेल तर दाणे भाजून जाडसर कूट करून घ्या.
  6. एका वाडग्यात वरील भाजलेले सर्व साहित्य एकत्र करा .
  7. त्यामध्ये तिखट ,मीठ ,मसाला ,आमचूर पावडर ,साखर घालुन छान मिक्स करा.
  8. आता मैदा छान भिजला असेल त्याला छान चुरून घ्या .
  9. एक छोटा गोळा घेऊन त्याची पुरी बनवतो तशी पारी लाटा जर पोळपाटाला चिकटत असेल तर मैद्याचे डस्टिंग तुम्ही करू शकता .पणपीठ घट्ट मळल्यामुळे तशी गरज पडत नाही.
  10. आता पारीच्या एका बाजूला दोन चमचे हा मसाला लांबोळा पसरावा .मसाला टाकताना तो काठावर येणार नाही याची काळजी घ्यायची.
  11. दोन साईडचे टोक आतमध्ये दुमडा
  12. आता वरचा भाग सारणाचा खाली थोडं पाण्याचं बोट घेऊन चिकटवा.
  13. आता हलकेच रोल करत आणा आतमध्ये पोकळ असता कामा नये .अगदी टूसटूस भरली पाहिजे नाहीतर तेलात टाकल्यावर ती उकलते.
  14. अशाप्रकारे सर्व सांबारवाडी बनवून घ्या.
  15. आता कढईत तेल टाका .आणि मंद आचेवर. हलक्या ब्राऊन रंगात तळून घ्या.हा तळण्याचा प्रकार असला तरी खूप कमी तेलात तयार होतो .शिवाय अजिबात तेलकट वाटत नाही.
  16. सांबारवडीसोबत खजूर आणि चिंचेची चटणी करून सर्व्ह करा.
  17. वाढदिवसाला आमच्याकडचा आवडता मेनू एक स्वीट ठेवलं कि झाली पार्टीची तयारी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर