मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा बिर्याणी

Photo of Egg Biryani by Neeta Mohite at BetterButter
578
5
0.0(0)
0

अंडा बिर्याणी

Mar-24-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा बिर्याणी कृती बद्दल

Without biryani parti is incomplete so why you are waiting let's see the easy recipe of egg biryani

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ कप बासमती तांदूळ, भिजवलेले
  2. ६ उकडलेले अंडी, साले काढून,मध्ये उभी चीर देवुन
  3. तळण्यासाठी तेल
  4. २ मध्यम टोमाटो, बारीक चिरून
  5. २ मध्यम कांदे, उभे पातळ काप करून
  6. २ चमचे आले – लसुण पेस्ट
  7. १ चमचा लाल तिखट
  8. १/२ चमचा हळद
  9. २ हिरव्या वेलची
  10. ३ लवंग
  11. १ दालचिनी
  12. कोथिंबीर, बारीक चिरून
  13. १/२ कप दही
  14. १ चमचा तूप
  15. १ चमचा गरम मसाला
  16. २ चमचे काजू
  17. १० मिरी

सूचना

  1. उकडलेल्या अंड्यांना लाल तिखट, दही, हळद, गरम मसाला पावडर आणि मीठ चोळून एका बाजूला ठेवून द्यावे.
  2. कढईत तेल गरम करून त्यामध्ये थोडा कांदा तळून घ्यावा आणि एका बाजूला ठेवून द्यावा.
  3. आता त्याच कढईत वेलची, दालचिनी, लवंग घालून हलवावे आणि त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतावा.
  4. त्यामध्ये आले- लसूण पेस्ट, काजू घालून २ -३ मिनिटे परतून लगेच टोमाटो घालून २ -३ मिनिटे शिजू द्यावे.
  5. वरील मिश्रणात कोथिंबीर आणि पुदिना घालून २ – ३ मिनिटे शिजवावे. त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून थोडा वेळ परतून पुरेसे पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे.
  6. पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये बासमती तांदूळ आणि तूप घालून चांगले एकत्र करा.
  7. आता तांदुळामध्ये मसाला चोळलेली अंडी घालून २० – ३० मिनिटे मंद आचेवर भात शिजू द्यावा.
  8. भात शिजल्यानंतर हलक्या हाताने हलवावा.  तळलेले कांद्याचे पातळ काप आणि कोथिंबीर यांनी सजवावा.
  9. गरम गरम असताना रायता बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर