मुख्यपृष्ठ / पाककृती / सरप्राईज कबाब

Photo of Surprise kabab by Aarti Nijapkar at BetterButter
648
4
0.0(0)
0

सरप्राईज कबाब

Mar-25-2018
Aarti Nijapkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सरप्राईज कबाब कृती बद्दल

सरप्राईज कबाब ही माझ्या डोक्यात सुचलेली पाककृती आहे तर कशी घरी शीरा केला होता तर घरचे म्हणाले गोड खाऊन कंटाळा येतो रव्या पासून काहीतरी तिखट कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनव तर विचार केल्यावर ही पाककृती सुचलेली आहे त्याच नाव सरप्राईज कबाब असे ठेवले आहे आणि ही पाककृती मी तुमच्या सोबत शेयर करते आहे तुम्हाला नक्की आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा १/२ वाटी
  2. पालक १ वाटी
  3. हिरवे मटार १/३ वाटी
  4. कोथिंबीर २ मोठे चमचे
  5. हिरवी मिरची १ ते २
  6. लसूण पाकळ्या २
  7. आलं १/२ इंच
  8. जिरे १/२ लहान चमचा
  9. ओवा १/२ लहान चमचा
  10. तीळ १/२ लहान चमचा
  11. गरम मसाला १/२ लहान चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. ज्वारीचे पीठ १/२ वाटी
  14. तांदळाचं पीठ १ मोठा चमचा
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पालक , कोथिंबीर ,हिरवी मिरची, हिरवे मटार , लसूण , आलं ,जिरे मिक्सर मधून बारीक वाटून घ्या हवं तर थोडे पाणी घाला
  2. एका कढईत रवा भाजून घ्या
  3. मग वाटलेलं मिश्रण रव्यात कढईत घाला व व्यवस्थित परतवून घ्या थोडे पाणी पाणी घालून चांगलं शिजवून घ्या मग गार करत ठेवा
  4. आता या मिश्रणात ज्वारीचे व तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ , गरम मसाला , ओवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  5. या मिश्रणाचे लहान कबाब चे आकारात रोल करून घ्या
  6. आता वरून थोडे ओट्स लावून घ्या पाण्याचा हात फिरवून मग ओट्स लावा
  7. कढईत तेल तापवून घ्या मध्यम आचेवर हे तळून घ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या
  8. गरमागरम व कुशकुशीत सरप्राईज कबाब तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर