Photo of Cheezy dabeli pizza by Ajinkya Shende at BetterButter
1227
8
0.0(2)
0

Cheezy dabeli pizza

Mar-25-2018
Ajinkya Shende
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • फ्युजन
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. *दाबेली पिझ्झा सॉससाठी-
  2. अर्धी वाटी चिंच
  3. ५-६ खजूर
  4. अर्धी वाटी साखर
  5. ५-६ पाकळ्या लसुण
  6. ३ काश्मीरी सुक्या लाल मिरच्या
  7. मीठ
  8. जीरा पावडर अर्धा चमचा
  9. *भाजीसाठी-
  10. ५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  11. तेल
  12. दिड चमचा दाबेली मसाला(नसल्यास पाव भाजी मसाला चालेल)
  13. १ चमचा काश्मीरी लाल मिर्ची पावडर
  14. पाव चमचा हळद
  15. मीठ
  16. पिझ्झा दाबेली सॉस
  17. *ईतर-
  18. पिझ्झा बेस
  19. बटर
  20. डाळींबाचे दाणे
  21. बारीक कापलेला कांदा
  22. मसाला शेंगदाणे
  23. बारीक शेव
  24. ३ चीज क्यूब

सूचना

  1. प्रथम पिझ्झा दाबेली सॉस बनवण्यासाठी एका पॅन मधे अर्धा ग्लास पाणी घेवून त्यात चिंच,खजूर व लाल मिरच्या टाकून ५ मिनिट उकळवुन घ्यावे.
  2. नंतर थंड झाल्यावर ५-६ लसुण पाकळ्या व साखर टाकून चिंच खजूराची मिक्सर मधे पेस्ट करून घ्यावी व गाळणीने गाळुन घ्यावी.
  3. नंतर पॅन मधे अर्धा चमचा बटर टाकून त्यात थोडसं भाजुन घेतलेल्या जिऱ्याची ची पुड टाकून त्यात तयार चिंच खजूराची पेस्ट व थोडं मीठ टाकावं व मध्यम आचेवर ४-५ मिनिट शिजवुन घ्यावी व तयार सॉस एका बाऊल मधे काढून ठेवावा.
  4. भाजी बनवण्यासाठी एका पॅन मधे २-३ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात दाबेली मसाला,लाल मिर्ची पावडर व हळद अर्धी वाटी पाण्यात मिक्स करुन टाकावे व मसाले अर्धा मिनिट परतवुन त्यात उकडुन मॅश केलेला बटाटा,३-४ चमचे दाबेली पिझ्झा सॉस व चवीनुसार मीठ टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करुन घ्यावी.
  5. पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा बेस च्या वरच्या बाजूला बटर लावून पॅन मधे मध्यम आचेवर खरपुस शेकुन घ्यावा.
  6. नंतर फ्लेम बंद करुन पिझ्झा बेस एका प्लेट मधे काढून खरपुस शेकलेल्या वरच्या बाजूला सॉस लावून त्यावर आवडीनुसार किसलेलं चीज टाकावं.
  7. नंतर त्यावर दाबेलीची भाजी व्यवस्थित लावून वरुन कांदा,डाळींबाचे दाणे व अजुन थोडं चीज किसुन टॉपिंग करुन घ्यावे.
  8. नंतर फ्लेम चालू करुन पॅन ला सर्व बाजूला व्यवस्थित बटर लावून घ्यावे व टॉपिंग केलेला पिझ्झा ठेवून वरून झाकण ठेवावे व मध्यम आचेवर खालची बाजू व्यवस्थित खरपूस होईपर्यंत पिझ्झा शिजवुन घ्यावा.
  9. तयार पिझ्झा सर्विंग प्लेट मधे काढून वरून बारीक शेव,मसाला शेंगदाणे,कांदा व डाळींबाचे दाणे टाकुन पिझ्झा गार्निश करुन घ्यावा(जेणेकरुन दाबेलीचा थोडा लूक येईल) व गरम,क्रिस्पी दाबेली पिझ्झा सर्व करावा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Mar-27-2018
Mamta Joshi   Mar-27-2018

जोरदार

tejswini dhopte
Mar-26-2018
tejswini dhopte   Mar-26-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर