Photo of Paneer chilli Dry by Neeta Mohite at BetterButter
2006
8
0.0(1)
0

Paneer chilli Dry

Mar-26-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Paneer chilli Dry कृती बद्दल

पनीर चिली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २०० ग्रॅम ताजे पनीर
  2. १ कप उभा चिरलेला कांदा
  3. १ कप भोपळी मिरची उभी चिरून
  4. ६-७ लसूण पाकळ्या चिरून
  5. २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
  6. १ टीस्पून विनेगर
  7. १/४ टीस्पून  मिरपूड
  8. १/४ कप डार्क सोया सोस
  9. ३  टेबलस्पून कॉर्नफ्लोर
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. १ चिमुट अजिनोमोटो 
  12. तेल

सूचना

  1. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
  2. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
  3. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
  4. पनीरचे तुकडे घालून परता.
  5. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी,  ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर  होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच Serve करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Neha Santoshwar
Mar-26-2018
Neha Santoshwar   Mar-26-2018

Mst:ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर