मुख्यपृष्ठ / पाककृती / टॉमेटो सॉस

Photo of TOMATO souce by Minal Sardeshpande at BetterButter
720
5
0.0(0)
0

टॉमेटो सॉस

Mar-27-2018
Minal Sardeshpande
1240 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टॉमेटो सॉस कृती बद्दल

कोणत्याही डिश सोबत मुलांना हमखास लागणार आवडीचा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. टॉमेटो एक की
  2. एक कांदा
  3. आठ लसूण पाकळ्या
  4. 10 मिरी दाणे
  5. 5 लवंगा
  6. 2 इंच दालचिनी तुकडा
  7. 60 ग्रॅम साखर
  8. दीड टीस्पून मीठ
  9. एक टीस्पून लाल तिखट
  10. एक टीस्पून व्हीनिगर
  11. अर्धा टीस्पून सोडियम बेंझॉईट

सूचना

  1. टॉमेटो स्वच्छ धुवा
  2. टोमॅटोचे दोन भाग करा.
  3. कांदा सोलून चार भाग करा.
  4. लसूण सोलून घ्या.
  5. टॉमेटो, कांदा, लसूण पाकळ्या, मिरी, दालचिनी, लवंग घालून या मिश्रणात पाणी न घालता कुकरच्या तळाशी पाणी घालून 15 मिनीटं शिजवा.
  6. गार होऊ द्या.
  7. मिक्सरला फिरवा.
  8. गाळणीने गाळून स्टीलच्या पातेल्यात घ्या.
  9. त्यात साखर, मीठ, तिखट मिसळा.
  10. गॅसवर आटवत ठेवा.
  11. पातेलं उंच असु द्या कारण कढताना मिश्रण हातावर उडू शकते
  12. सतत ढवळत रहा.
  13. मिश्रण घट्ट होत आलं की गॅस बंद करा.
  14. गार होऊ द्या.
  15. जर तुम्हाला प्रिझर्व्हेटिव्ह नको असेल तर हा सॉस काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमधे ठेवा.
  16. पण जर बाहेर ठेवणार असाल तर त्यात एक टीस्पून व्हीनिगर आणि अर्धा टी स्पून सोडियम बेंझॉइट मिक्स करा.
  17. एक पातेल्यात पाणी उकळत ठेवा. बाटली ज्यात सॉस भरायचाय त्याच्या पाऊण भागापर्यंत येऊदे.
  18. सॉसच्या रिकाम्या कोरड्या बाटलीत थोडी वर जागा राहील असा सॉस भरा.
  19. पाणी उकळले की त्यात कुकरची जाळी ठेवून त्यावर दहा मिनिटं झाकण न लावता बाटल्या ठेवा.
  20. सॉस थोडा वर येईल.
  21. आता घट्ट झाकण लावा.
  22. हे सॉस व्यवस्थित टिकतं!
  23. घरच्या घरी तयार!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर