Photo of PAV BHAJI by Sujata Loke at BetterButter
2147
7
0.0(0)
0

पाव भाजी

Mar-27-2018
Sujata Loke
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

मुलांना मोठ्यांना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. फ्लावर पाव किलो
  2. बटाटे 1 किलो
  3. सिमला मिरची 2
  4. टोमॅटो 6 ते 7
  5. मटार 1 वाटी
  6. बीट 1 मध्यम
  7. गाजर 1 मोठे
  8. कांदे अर्धा किलो
  9. बटर 150 ग्रॅम
  10. चिरलेली कोथिंबीर 1 वाटी
  11. काश्मीरी मिरची 6 ते 7
  12. धणे 4 टी स्पून
  13. जिरे 2 टी स्पून
  14. मीठ चवीनुसार
  15. लिंबू 2
  16. पावभाजी मसाला 1 टे स्पून
  17. आले,लसुणाची पेस्ट 1 टे. स्पून
  18. छोटे पाव 30

सूचना

  1. कुकरच्या पातेल्यात फ्लावरचे बारीक तुकडे त्यात बिटाचे तुकडे, गाजराचे तुकडे करून धूवून थोडे पाणी घालावे
  2. बटाटे सोलून किंव्हा दोन तूकडे करून कुकरच्या दुसऱ्या पातेल्यात थोडे पाणी घालून दोन्हीं पातेल्यात ठेवून सुमारे 7 ते 8 शिट्या काढावेत
  3. एका छोट्या पातेल्यात पाण्यात काश्मिरी मिरची धणे, जिरे घालुन एक उकळ आणावी. थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पेस्ट करावी
  4. तेलात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावे ,त्यात टोमॅटो बारीक चिरलेला परतावा,नंतर आले,लसुणाची पेस्ट परतून घ्यावी
  5. यानंतर तेल सुटू लागल्यावर मिरचीची पेस्ट ,बारीक चिरलेली सिमला मिरची, क्रश केलेले मटार घालावी.उकडलेला फ्लावर, बीट, आणि गाजर थोडा स्मॅश करून घालावे, थोड्या वेळाने मीठ सोलुन बटाटा स्मॅश करून मिश्रण हालवत राहणे, तळाला लागण्याची शक्यता असते .शेवटी पावभाजी मसाला, 1 लिंबु पिळून घालून ,थोडे बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  6. सर्व्ह करताना बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर,लिंबू,छोटे पाव मध्ये चिरून त्याला बटर लावून खरपुस तव्यावर परतुन घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर