मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब जामुन

Photo of Gulab Jamun by Rita Arora at BetterButter
8598
148
5.0(0)
0

गुलाब जामुन

Apr-04-2016
Rita Arora
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब जामुन कृती बद्दल

खवा व पनीर पासून बनणारे गोड पुडिंग.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मऊ खवा - 250 ग्रॅम
  2. पनीर - 100 ग्रॅम
  3. चाळून घेतलेला आटा - 1/3 कप
  4. काजू - 1 टेबल स्पून
  5. चिरोंजी - 1 टेबल स्पून
  6. वेलदोडा पावडर - 1/4 टी स्पून
  7. साखरेच्या पाकासाठी :
  8. साखर - 3 कप
  9. पाणी - 1 1/2 कप
  10. वेलदोडा पावडर 1/4 टी स्पून

सूचना

  1. साखरेच्या पाकासाठी :
  2. पॅन गरम करून त्यात पाणी व साखर घालावी, पाणी उकळू द्यावे, ते उकळू लागल्यावर 4-5 मिनिटे किंवा तार येईपर्यंत उकळावे. वेलदोडा पावडर घालून आच बंद करावी.
  3. गुलाब जामुनसाठी :
  4. एका बाऊलमध्ये खवा, पनीर व चाळलेला आटा घालून तुमच्या तळव्याने चांगले मऊ होईपर्यंत मळावे.
  5. भरावासाठी : एका छोट्या बाऊलमध्ये, सुकामेवा व वेलदोडा पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे.
  6. तयार झालेल्या पीठातील छोटा गोळा घेऊन तुमच्या तळव्याने दाबून सपाट करावा , त्यात थोडा भराव घालून सर्व बाजूंनी झाकून त्याचा गोळा बनवावा .
  7. हे गोळे मध्यम गरम तेलात सोडावेत , मंद आचेवर गोळे तळावे .
  8. आता या गोळ्यांवर डावाने तेल ओतावे. डाव त्याला लागू देऊ नये.
  9. डाव हळु हळु फिरवावा, त्यामुळे गोळे सर्व बाजूनी समान तळले जातील.
  10. तांबूस गोळे तेलातून बाहेर काढावेत, आता ते गोळे गोड, मऊ व हलके गुलाब जामुन तयार होण्यासाठी ते कोमट साखरेच्या पाकात 1-2 तास मुरू द्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर