मुख्यपृष्ठ / पाककृती / आम्रखंड पुरी

Photo of Amrakhand Puri by Archana Lokhande at BetterButter
1099
4
0.0(0)
0

आम्रखंड पुरी

Mar-30-2018
Archana Lokhande
300 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम्रखंड पुरी कृती बद्दल

लहानांपासून मुलांची सर्वात आवडणारी रेसिपी आम्रखंड पुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दही १/२ किलो
  2. पिठीसाखर आवडीनुसार
  3. आंब्याचा गर १/२ वाटी
  4. वेलची पूड १ चमचा
  5. गव्हाचे पीठ
  6. मीठ
  7. तेल
  8. पाणी

सूचना

  1. दुध गरम करून ते सोमट(कोमट) करून घेतले.
  2. दुधात चमचाभर दह्याचे विरजण घालून मिक्स करून घेतले.
  3. हे मिश्रण रात्रभर फ्रिजमध्ये ठेवले.
  4. दुसऱ्या दिवशी घट्ट दही एका सुती कापडावर ओतून त्याची पुरचुंडी(गाठ) बांधून ४-५ तास टांगून ठेवले.
  5. ४-५ तासांनी दह्याचा गोळा एका बाऊलमध्ये घेतला.
  6. नंतर तो छान फेटून घेतला.
  7. फेटल्यावर त्याचा छान चक्का तयार होतो आणि त्याला चमक येते
  8. तयार चक्क्यात आवडीनुसार पिठीसाखर घालून मिक्स करून घेतला.
  9. आता त्यात आंब्याचा वाटलेला गर आणि वेलची पूड घालून मिक्स करून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले.
  10. पुरीसाठी गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून मळून थोडावेळ भिजत ठेवले.
  11. नंतर तयार कणकेच्या पुर्या लाटून गरम तेलात तळून घेतल्या.
  12. आता तयार पुर्या आणि थंड थंड आम्रखंड खायला घ्या वाढून..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर