मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्लॅक फॉरेस्ट केक

Photo of Black forest cake by Aarti Nijapkar at BetterButter
2958
7
0.0(0)
0

ब्लॅक फॉरेस्ट केक

Apr-02-2018
Aarti Nijapkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्लॅक फॉरेस्ट केक कृती बद्दल

ब्लॅक फॉरेस्ट केक हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार केक आहे तर आज आपण बनऊयात ब्लॅक फॉरेस्ट केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • व्हिस्कीन्ग
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. चॉकलेट स्पॉंज
  2. बटर ६० ग्रॅम
  3. कॉंडेज्ड मिल्क १८० ग्रॅम
  4. दूध १/२ कप
  5. मैदा १ १/२ कप
  6. बेकिंग पावडर १/२ लहान चमचा
  7. वेनीला इसेन्स १ लहान चमचा
  8. फ्रुट सोडा १ मोठा चमचा
  9. पाणी २ मोठे चमचे
  10. केक क्रीम फेटलेली २५० ग्रॅम
  11. साखरेचं पाणी केक वर शिंपडायला
  12. डार्क चॉकलेट किसलेलं १ कप
  13. ताजी चेरी

सूचना

  1. ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा बेकिंग ट्रे ला ग्रीस करा व मैदा शिंपडून घ्या
  2. मैदा , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर , किंचित मीठ , कोको पावडर घालून एकत्र करून ठेवा
  3. एका बाउल मध्ये बटर व कॉंडेज्ड मिल्क व्हिस्क करा क्रीम होईपर्यंत व्हिस्क करा
  4. आता मैद्याचं मिश्रण घालून एकजीव करून घ्या आता दूध घालून व्हिस्क करून घ्या 
  5. पाण्यात फ्रुट सॉल्ट घालून लगेचच मिश्रणात घाला व एकजीव करून घ्या व्हिस्क करू नका
  6. तयार मिश्रण ट्रे मध्ये घालून ओव्हन मध्ये ठेवून १८०* से वर २० ते २५ मिनिटे बेक करून घ्या
  7. बेक झाल्यावर केक गार करून घ्या
  8. आता चॉकलेट स्पॉंज मधून कापून घ्या वर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग फेटलेलं फ्रेश क्रीम लावून घ्या व चेरी घाला मध्यम आकाराच्या कापलेले सर्वत्र घालून घ्या
  9. आता पुन्हा तसच करून घ्या
  10. शेवटच्या केक स्पॉंज वर साखरेचं पाणी शिंपडून केक ची क्रीम लावून पूर्ण फिनिशिंग करून घ्या ८ ते १० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा
  11. मग किसलेले डार्क चॉकलेट केक ला लावून घ्या
  12. आता क्रीम चा ड्रॉप देऊन ताजी चेरी लावून घ्या
  13. फ्रीज मध्ये ठेवा व सेट करा मग सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर