मुख्यपृष्ठ / पाककृती / भोपळ्याचे धपाटे

Photo of Bhopalyache Dhapate by Sudha Kunkalienkar at BetterButter
1018
3
0.0(0)
0

भोपळ्याचे धपाटे

Apr-12-2018
Sudha Kunkalienkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भोपळ्याचे धपाटे कृती बद्दल

धपाटे ही महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे. धपाटेवेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. मी लालभोपळ्याचे धपाटे बनवते. त्यात मी कणिक आणिराजगिऱ्याच्या लाह्या घालते. राजगिऱ्याच्या लाह्यांमुळेधपाटे गार झाल्यावर सुद्धा मऊ राहतात. मुलांनाडब्यात देण्यासाठी सुद्धा छान पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लाल भोपळ्याचा कीस दीड कप
  2. कणीक दीड कप अंदाजे
  3. राजगिर्याच्या लाह्या १ कप
  4. हिरवी मिरची ठेचून अर्धा चमचा
  5. लसूण ४-५ पाकळ्या बारीक चिरून
  6. तीळ मोठा दीड चमचा
  7. ओवा १ चमचा
  8. हळद पाव चमचा
  9. साखर अर्धा चमचा
  10. आमचूर अर्धा चमचा
  11. तेल १ चमचा आणि धपाटे भाजण्यासाठी
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका पातेल्यात अर्धा चमचा तेल घालून त्यातभोपळ्याचा कीस घाला. २ मिनिटं परतून घ्या. २-३मिनिटं झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवा.
  2. एका थाळीत काढून गार करा
  3. थाळीत एक कप कणिक घाला. तेल वगळून बाकीसर्व साहित्य घाला. एकत्र करून पीठ भिजवून घ्या. पीठ सैल असेल तर एक एक चमचा कणिक घालूनभिजवा. पीठ घट्ट असलं पाहिजे.
  4. अर्धा चमचा तेल घालून पीठ नीट मळून घ्या. १०मिनिटं पीठ झाकून ठेवा.
  5. मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून जरा जाडसरधपाटे लाटून घ्या.
  6. गरम तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूनी छानभाजून घ्या.
  7. गरमागरम धपाटे लोणी आणि चटणी बरोबर सर्व्हकरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर