मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचे ईजी पराठे

Photo of Pottato easy parotha by Teesha Vanikar at BetterButter
594
5
0.0(0)
0

बटाट्याचे ईजी पराठे

Apr-16-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचे ईजी पराठे कृती बद्दल

नेहमी आपण बटाट्याच्या भाजीचे सारण भरुन पररोठे करतो,त्या झनझंटीपासुन मुक्तता म्हणुन मी हे ईजी पध्दतीचे परोठे बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ ऊकडलेले बटाटे
  2. २ वाटी गव्हाचे पिठ
  3. १ मोठा कांदा
  4. १ टी.स्पु गरम मसाला
  5. ३ टी.स्पु लाल तिखट
  6. १/२ टी.स्पु हळद
  7. १ चमचा कसुरी मेथी (ऐच्छीक)
  8. ३ चमचे कोथिंम्बीर
  9. १/२ वाटी तेल मोहनासाठी
  10. २ टी.स्पु आलं लसुन पेस्ट
  11. तेल

सूचना

  1. बटाटे चांगले स्मँश किवां किसुन घ्या
  2. मोठ्या बाऊलमध्ये बारीक कापलेला कांदा,बटाट्याचा लगदा ऐकत् मिक्स करा
  3. वरील मिश्रणात गव्हाचे पिठ व सर्व् मसाले आणि १/२ वाटी तेल घाला
  4. हाताने चांगले मिक्स करा व कोथिंम्बीर घालुन पिठ मळुन घ्या
  5. पिठाला तेलाचा हात लावुन ६/७ मि.झाकुन ठेवा
  6. पिठाचे समान गोळे करुन परोठे जरा जाडसर लाटुन दोन्ही बाजुने तेल किवां बटर लावुन शेकुन घ्या
  7. ईजी परोठे रेडी सॉस किवां चटनीसोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर