मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पॅटीस

Photo of Ragda patties by Pratiksha Jadhav at BetterButter
1198
6
0.0(0)
0

रगडा पॅटीस

Apr-22-2018
Pratiksha Jadhav
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रगडा पॅटीस कृती बद्दल

मुंबई चौपाटी स्पेशल

रेसपी टैग

  • मध्यम

साहित्य सर्विंग: 4

  1. 5/6 बटाटे (उकडून घेणे)
  2. 2 मोठे कांदे
  3. 2 टोमॅटो
  4. पाव किलो पांढरे वाटाणे (8 तास पाण्यात भिजत ठेवावे)
  5. 10/12 कढीपत्त्याची पाने
  6. कोथिंबीर
  7. 1/2 चमचा मोहरी
  8. 1 लहान चमचा हळद
  9. 1 चमचा लाल तिखट
  10. 5/6 हिरव्या मिरच्या
  11. 2 इंच आले
  12. 10/12 लसूण पाकळ्या
  13. काॅर्नफ्लाॅवर
  14. 2 तुकडे दालचिनी
  15. 2 तमालपत्र
  16. चवीनुसार मीठ
  17. 1 मोठी वाटी तेल
  18. हिरवी चटणी
  19. चिंच गुळाची गोड चटणी
  20. बारीक शेव
  21. 1 कांदा व टोमॅटो चिरून घेणे
  22. बीट व गाजरचा किस

सूचना

  1. उकडलेले बटाटे मॅश करून घेणे.
  2. आल, लसूण, मिरची मिक्सर मधून जाडसर वाटून घेणे.
  3. कढईत 1 चमचा तेल घालावे.
  4. तेल गरम झाले की मोहरी घालावी.
  5. कढीपत्त्याची पाने घालावी.
  6. वाटलेले 1 इंच आले, 4/5 लसूण पाकळ्या व मिरची टाकावी.
  7. हिंग, हळद व मीठ टाकावे.
  8. आता मॅश केलेला बटाटा घालून चांगले परतावे गॅस बंद करावा.
  9. बटाट्याच्या सारणाचे चपटे पॅटीस करून घ्यावे.
  10. काॅर्नफ्लाॅवर मध्ये घोळूवून शॅलो फ्राय करावे.
  11. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 इंच आल व 4/5 लसूण पाकळ्यांची पेस्ट करून घ्यावी.
  12. पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल घालावे.
  13. मोहरी घालावी,दालचीनी आणी तमालपत्र घालावे नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट टाकावी.
  14. हे सर्व तेल सूटे पर्यंत चांगले परतून घ्यावे.
  15. त्यात हळद, हिंग व तिखट घालावे.
  16. आता भिजलेले वाटाणे घालून चांगले परतावे.
  17. 4/5 वाट्या गरम पाणी घालून शिट्ट्या घ्याव्यात.
  18. एका डीश मध्ये 2 पॅटीस ठेवावे, त्यावर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी चटणी, बारीक शेव, बीट-गाजराचा किस व चाट मसाला भूरभूरावा आणि सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर