Photo of Paneer 65 by Nayana Palav at BetterButter
1371
20
0.0(4)
0

Paneer 65

Apr-24-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Paneer 65 कृती बद्दल

पनीर चे तेच तेच प्रकार खाउन आपल्याला कंटाळा येतो. पनीरच्या काही डिशेस हया गोड असतात, काहीजणांना ह्या गोड डिश आवडत नाही. पनीर ची डिश, पण तिखट, काय कराव बरं? या विचारात मी होते. तेंव्हां मला ही डिश आठवली, पण मी यात पनीर तळले नाही. असेच कापून घातले आहे. पनीर मध्ये प्रथिन आहेत. आणि पनीर तळलेले नाही, त्यामुळे ही एक पौष्टिक डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर ३०० ग्राम
  2. कांदा २
  3. भोपळी मिरची २
  4. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  5. काश्मीरी मिरची पावडर १ टेबलस्पून
  6. गरम मसाला १/२ टीस्पून
  7. तेल फोडणीसाठी
  8. हळद १/४ टीस्पून
  9. हिंग १/४ टीस्पून
  10. कढीपत्ता ८-१० पाने
  11. हिरव्या मिरच्या ४ कमी तिखट असलेल्या

सूचना

  1. कढईत तेल गरम करा.
  2. त्यात हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला.
  3. आता कांदा घाला.
  4. आलं लसूण पेस्ट, मसाले घाला.
  5. नीट परता.
  6. आता उभी चिरलेली भोपळी मिरची घाला.
  7. आता यात पनीर उभे कापून घाला.
  8. नीट परता.
  9. ५ मिनिटे शिजू द्या.
  10. तयार आहे अनोख्या चवीचे पनीर ६५.
  11. चपाती, रोटी, नान, पराठा बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (4)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Wow.....

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर