मुख्यपृष्ठ / पाककृती / लोणी ताकाची भुर्जी

Photo of Buttermilk Bhurji by Renu Kulkarni at BetterButter
818
10
0.0(0)
0

लोणी ताकाची भुर्जी

Apr-24-2018
Renu Kulkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लोणी ताकाची भुर्जी कृती बद्दल

लोणी काढल्यावर उरलेले ताक फार दाट असते....ते साधे पिण्यासाठी वा कढी करण्यासाठी चांगले लागत नाही. तेव्हा पाहूया ही आगळी वेगळी लोणी ताकाची भुर्जी. ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • स्टर फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लोणी काढल्यावर उरलेले ताक 1 लिटर
  2. कांदा चिरून 1 वाटी
  3. सिमला मिरची चिरून 1 वाटी
  4. गाजर चिरून 1/2 वाटी
  5. हिरव्या मिरच्या चिरून 4
  6. आले कीस 1 टीस्पून
  7. मिरपूड 1/2 टीस्पून
  8. मीठ 1 टीस्पून
  9. तिखट 1 टिस्पून
  10. हळद 1/2 टीस्पून
  11. तुप काढून उरलेली बेरी 1/4 वाटी
  12. तेल 1/2 टेबलस्पून

सूचना

  1. लोणी काढल्यावर उरलेले ताक गॅसवर गरम करा.
  2. पाच दहा मिनिटात पनीर व पाणी वेगळे होइल.
  3. ते गाळून घ्या. एक वाटी पनीर तयार होईल.
  4. लोणी कढवून तुप गाळून उरलेली बेरी वेगळी करा.
  5. कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व कांदा घाला.
  6. परतून आले कीस. .हळद व तिखट घालावे.
  7. परतून बेरी व मिरपूड घाला.
  8. कांदा मऊ होईपर्यंत व बाजूने तेल सुटेपर्यंत परता.
  9. मीठ..सिमला मिरची. .व गाजर घाला...
  10. परतल्यावर लगेच पनीर घालून परतून घ्यावेत.
  11. 2..3 मिनिट परतून घ्यावेत.
  12. भुर्जी तयार...
  13. गरमागरम भुर्जी पोळी सोबत वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर