मुख्यपृष्ठ / पाककृती / पंजाबी छोले मसाला

Photo of Punjabi chole masala by Deepika Chauhan at BetterButter
3923
198
4.8(0)
1

पंजाबी छोले मसाला

Apr-23-2016
Deepika Chauhan
540 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंजाबी छोले मसाला कृती बद्दल

मला या पाककृतीची प्रेरणा एका पाककला पुस्तकातून आणि तसेच, तरला दलाल यांच्या पाककला पुस्तकावरून मिळाली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यासाठी:
  2. 2 वाट्या छोले
  3. 2 कप पाणी
  4. 2-3 सुकलेले आवळे
  5. मीठ स्वादानुसार
  6. मसाला रश्यासाठी :
  7. कांदा - 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला
  8. टोमॅटो - 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला
  9. 2-3 लसणाच्या पाकळ्या + 1 लहान आल्याचा तुकडा = लसूण आल्याची पेस्ट
  10. हिंग - 1/4 लहान चमचा
  11. लाल तिखट - 1 लहान चमचा
  12. धणेपूड - 1/2 लहान चमचा
  13. जिरेपूड - 1/2 लहान चमचा
  14. पंजाबी छोले मसाला - 2 लहान चमचे
  15. हळद - 2 लहान चमचे
  16. 2 काळे वेलदोडे
  17. 4 काळे मिरे
  18. 1 लवंग
  19. 2 सुकलेल्या लाल मिरच्या
  20. 1/2 लहान चमचा गरम मसाला
  21. 1/2 लहान चमचा आमचूर पावडर
  22. सजविण्यासाठी :
  23. कोथिंबीर चिरलेली

सूचना

  1. रात्रभर पाण्यात भिजवलेले छोले. (योग्य प्रमाणात पाणी घाला.) गडद रंग येण्यासाठी पारंपारिक असे सुकलेले आवळे घातले जातात.
  2. प्रेशर कुकरमध्ये छोले आणि सुकलेले आवळे घाला. त्यात मीठ आणि पाणी घाला. 20 मिनिटांपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवा. (एकदा ते शिजले की त्यातून आवळ्याचे तुकडे काढून टाका.)
  3. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात हिंग, काळे वेलदोडे, मिरे, लवंग, लसूण-आल्याची पेस्ट, सुकलेल्या लाल मिरच्या घालून चांगले परता.
  4. नंतर त्यात चिरलेला कांदा घाला आणि परता. नंतर चिरलेला टोमॅटो घालून चांगले शिजवा.
  5. हळद, लाल तिखट, जिरेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला, पंजाबी छोले मसाला आणि स्वादानुसार मीठ घालून एकजीव करा.
  6. छोले शिजवण्यासाठी जे पाणी वापरले होते ते पाणी घालून काही वेळ शिजवा.
  7. कोथिंबीरीने सजवा आणि हे पंजाबी छोले कुलचा, भटुरे, पुऱ्या आणि कांदा, टोमॅटो आणि लिंबाचे काप यांच्यासह वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर