Photo of Jaggery & wheat flour Cake by sharwari vyavhare at BetterButter
973
7
0.0(1)
0

Jaggery & wheat flour Cake

May-02-2018
sharwari vyavhare
240 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Jaggery & wheat flour Cake कृती बद्दल

गुळ आणि गव्हाचे पिठ या पासून केकची चव नेहमीच्या केक पेक्षा खुप वेगळी लागेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पिठ १ कप
  2. दुध पावडर १ कप
  3. लोणी १ / ३ कप
  4. दुध १ कप
  5. द्राधाचा ज्युस १ १/२ कप
  6. काजु, बदाम, आक्रोड, मनुके, पिस्ता, खारीक सर्व मिळून १ कप
  7. दालचीनी पावडर १ चमचा
  8. विलायची पावडर १/२ चमचा
  9. जायफळ पावडर १ / ४ चमचा
  10. बेकिंग पावडर २ चमचे
  11. बेकिंग सोडा १ / २ चमचा
  12. मिठ चिमुटभर
  13. गुळ २ कप

सूचना

  1. सर्व प्रथम ज्युस मध्ये सर्व ड्रायफ्रुट ४ तास भिजत घाला.
  2. गव्हाचे पिठ, सोडा, बेकिंगपावडर, मिठ, दालचिनी, विलायची , जायफळ पावडर सर्व ३ वेळा चाकुन घ्या.
  3. गुळ खिसुन घ्या .
  4. डबल बॉइल पद्धतीने गुळ वितळुन घ्या.
  5. एका कढईत मिठ घाला. स्टॉड ठेवा. कढईवर झाकण झाकूण स्लॉ गॅसवर ठेवून घ्या
  6. एका भांड्यात लोणी घ्या.
  7. दुध पावडर घालून मिक्स करा.
  8. नंतर दुध घालून मिक्स करा .
  9. भिजत घातलेले ड्रायफ्रुट घाला.
  10. चाळुन घेतलेले सर्व जिन्नस घालून मिक्स करा .
  11. मेल्ट केलेला गुळ घालून मिक्स करा .
  12. Cut and fold पध्दतीने मिक्स करा.
  13. केकच्या भांड्याला बटर पेपर लावून घ्या.
  14. बटर पेपरला तुप लावा .
  15. केकचे मिश्रण ओता.
  16. कढईत केकचे भांडे ठेवून दया.
  17. वरून ताट झाका .
  18. मध्यम गॅस वर ३५ ते ४० मि ठेवून केक बेक करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Vyavahare
May-02-2018
Prajkta Vyavahare   May-02-2018

Healthy cake

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर