मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन काशा (ओडिशाची थोडीशी कोरडी चिकन करी)

Photo of Chicken Kasha (Semi-Dry Chicken Curry from Odisha) by sweta biswal at BetterButter
5354
62
4.0(0)
0

चिकन काशा (ओडिशाची थोडीशी कोरडी चिकन करी)

Apr-25-2016
sweta biswal
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • ओरिसा
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. 250 ग्रॅम्स चिकनचे तुकडे
  2. 1 मोठा कांदा
  3. 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट
  4. 1 मोठा चमचा टोमॅटोचा रस
  5. 2-3 हिरव्या मिरच्या
  6. अर्धा लहान चमचा धणेपूड
  7. 1/4 लहान चमचा धणेपूड
  8. अर्धा लहान चमचा लाल तिखट
  9. अर्धा ते एक लहान चमचा सोया सॉस
  10. 1/3 लहान चमचा गरम मसाला
  11. अर्धा लहान चमचा हळद
  12. 4 लहान चमचे तेल
  13. मीठ स्वादानुसार
  14. अर्धा लहान चमचा साखर
  15. सजविण्यासाठी कोथिंबीर

सूचना

  1. चिकनचे तुकडे धुवा. त्यात हळद, 1 लहान चमचा तेल आणि मीठ घाला. मिसळा आणि 30 मिनिटांसाठी मेरीनेट करावयास ठेवा.
  2. कांदा सोला आणि वाटून त्याची खडबडीत पेस्ट तयार करा.
  3. एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात साखर घाला. ती थोडी तपकिरी झाली की त्यात वाटलेला कांदा घाला. जवळजवळ 2-3 मिनिटे तळा.
  4. आले लसणाची पेस्ट घाला आणि तीव्र गंध जाईपर्यंत परता.
  5. आता यात सर्व कोरडे मसाले घाला आणि एक मिनिट भाजा.
  6. टोमॅटो प्युरी घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
  7. मेरीनेट केलेले चिकन घाला. 2-3 मिनिटांसाठी मोठ्या आचेवर हलवा. झाकण लावून चिकन मऊ होईपर्यंत शिजवा. तळाला लागू नाही म्हणून अधून मधून हलवा. अतिशय कोरडे वाटल्यास थोडे पाणी शिंपडा.
  8. सोया सॉस आणि हिरव्या मिरच्या घाला. मोठ्या आचेवर 2 मिनिटांसाठी चिकनचे तुकडे टॉस करा.
  9. आचेवरून खाली उतरवा आणि पोळ्या/पुऱ्या/भात/पुलावबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर