मुख्यपृष्ठ / पाककृती / चुंचीपात्र पीठा (एक कमी कॅलरीवाले ओरिसी मिष्टान्न)

Photo of Chunchipatra Pitha (A Low calorie Odia Delicacy) by sweta biswal at BetterButter
4178
19
5.0(0)
0

चुंचीपात्र पीठा (एक कमी कॅलरीवाले ओरिसी मिष्टान्न)

Apr-25-2016
sweta biswal
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • ओरिसा
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी बासमती/जीरा/अर्वा तांदूळ
  2. 1 पूर्ण नारळ
  3. साखर/गूळ स्वादानुसार
  4. 1-2 हिरवे वेलदोडे
  5. 1-2 लहान चमचे तूप (शाकाहारी लोक कोणतेही गंधहीन स्वयंपाकाचे माध्यम वापरू शकतात)
  6. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. तांदूळ धुऊन रात्रभर भिजत ठेवा.
  2. अतिरिक्त पाणी काढून टाका. अगदी बारीक पेस्ट करा. यात मीठ आणि पाणी घाला आणि पातळ करा. 1-2 तासासाठी बाजूला ठेवा.
  3. नारळ किसून घ्या आणि बाजूला ठेवा.
  4. एका कढईत 1 लहान चमचा तूप गरम करा. त्यात खोबरे घालून गुलाबी होईपर्यंत परता. त्यात साखर/गूळ घालून पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवा. गॅसवरून उतरावा आणि बाजूला ठेवा.
  5. एक तवा गरम करा. त्याला तूप लावा. पेपर रुमालाने अतिरिक्त तूप पुसून घ्या, नाहीतर मिश्रण व्यवस्थित पसरणार नाही.
  6. एक पातळ कॉटनचे कापड/हातरुमाल घ्या आणि आयताकारात दुमडून घ्या. मिश्रणात बुडवा आणि बाहेर काढा आणि हलक्या हाताने तव्यावर त्याने अधिकचे चिन्ह करा. आच कमी ते मध्यम ठेवा. ते शिजले की त्याच्या कडा अलगद वर येतील.
  7. मध्यभागी नारळाचे सारण ठेवा आणि त्यावर त्याच्या कडा दुमडा. त्यावरून काढा आणि बाजूला ठेवा.
  8. एका पेपर रुमालाने तवा पुसा आणि पुन्हा दुसरे पीठा बनविण्यासाठी घ्या. (4-5 पीठा झाल्यानंतर, मिश्रण थोडेसे घट्ट होईल. त्यात काही चमचे पाणी घालून पातळ करा आणि त्या प्रमाणात मीठ घाला)
  9. पिवळ्या वाटाण्याच्या करी/दालमाबरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर