भरली वांगी | Bharli Vaangi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  15th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bharli Vaangi recipe in Marathi,भरली वांगी, Deepa Gad
भरली वांगीby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

6

0

भरली वांगी recipe

भरली वांगी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bharli Vaangi Recipe in Marathi )

  • वांगी छोटी पाव किलो
  • बटाटे छोटे २
  • ओले खोबरे १ वाटी
  • कांदा ४
  • टोमॅटो १
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २-३ चमचे
  • मालवणी मसाला २ चमचे
  • कांदा लसूण मसाला १ चमचा
  • धनेजिरे पावडर १ चमचा
  • चिंचेचा कोळ २ चमचे
  • मीठ चवीनुसार

भरली वांगी | How to make Bharli Vaangi Recipe in Marathi

  1. वाटणासाठी ओल खोबरं किसलेलं, कांदा उभा चिरलेला भाजून लालसर घ्या व मिक्सरमध्ये वाटा
  2. वाटणात मालवणी मसाला, शेंगदाण्याचे कूट, मीठ घालून एकजीव करा
  3. वांग्यांना चिरा पाडून घ्या त्यात वरील वाटणाचे मिश्रण भरा
  4. कढईत तेल चिरलेला कांदा, टोमॅटो घालून चांगलं मऊ होईपर्यंत शिजवा
  5. नंतर त्यात मालवणी मसाला, कांदा लसून मसाला, आलं लसूण पेस्ट, धनेजिरे पावडर, मीठ घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परता
  6. भरलेली वांगी बटाटे तुकडे व राहिलेलं वाटण, थोडं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा
  7. चिंचेचा कोळ घाला, शिजवा
  8. कोथिंबीर पेरा, सर्व्ह करा

My Tip:

हे सर्व मंद आचेवर शिजवा, वांगी चांगली शिजली पाहिजेत

Reviews for Bharli Vaangi Recipe in Marathi (0)